आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीत पालापाचाेळ्याचे ठिकठिकाणी साचले ढीग, प्रत्येक प्रभागात पालापाचाेळा उचलण्यासाठी वाहन असूनही दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उन्हाळा सुरू हाेताच पानगळ सुरू असून, सर्वच रस्त्यांवर अाणि उद्यानांमध्ये वाळलेल्या पानांचा अक्षरश: ढीग दिसत अाहे. या कचऱ्याला फारसे वजन नसल्याने घंटागाडी कर्मचारी ताे उचलत नाही अाणि असा कचरा साफ करण्याची जबाबदारी अामची नाही, असे उद्यान विभागाचे कर्मचारी सांगतात. त्यावर उपाययाेजना म्हणून प्रत्येक विभागीय कार्यालयात पालापाचाेळा उचलण्यासाठी एका वाहनाची व्यवस्था करण्यात अाली तरीही ही वाहने नियमितपणे प्रभागांत फिरतच नसल्याने स्मार्ट सिटी अर्थात नाशिकमध्ये कचऱ्याचे ढीग सर्वत्र दिसत अाहेत. 
 
 
पालपाचाेळ्याचा कचरा नक्की काेणी उचलावा याबाबत अाराेग्य विभाग अाणि उद्यान विभाग यांच्यात दाेन पंचवार्षिक काळापासून वाद सुरु अाहे. स्वच्छता कर्मचारी दरराेज रस्ते झाडत असले तरीही त्यांच्या जबाबदारीत कचरा उचलून घंटागाडीत टाकण्याच्या कामाचा समावेश हाेत नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी रस्ते साफ करून कचरा एका बाजूला लावून देतात.
 
 घंटागाडी कर्मचारीही असा कचरा उचलण्यास उत्सुक नसतात.कचरा डेपाेत वजन करूनच कचरा स्वीकारला जाताे. पालापाचाेळ्याच्या कचऱ्याचे फारसे वजन भरत नसल्याने घंटागाडी कर्मचारीही ताे उचलत नाही. अशा परिस्थितीत ताे दिवसेंदिवस एकाच ठिकाणी पडून राहताे. कालांतराने ताे सडायला लागताे. शहरात फेरफटका मारला असता ठिकठिकाणी अशा पालापाचाेळ्याचे ढीग साचलेले दिसतात. 

गेल्या सात ते अाठ वर्षांपासून पालापाचाेळ्याचा प्रश्न उपस्थित हाेत असताना अद्यापही त्यावर सक्षम पर्याय उपलब्ध हाेऊ शकणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीचेच अपयशच मानले जात अाहे. हा प्रश्न अतिशय छाेटा असला तरीही नागरी अाराेग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याने अायुक्तांनी तरी यासाठी ठाेस उपाययाेजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.
 
कचऱ्याचा डाेंगर कधीपासून उभा 
-घंटागाडी कर्मचारी वा उद्यान विभागाचे कर्मचारी पालापाचाेळा उचलत नाहीत. नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा हाेताना दिसत नाही. पंपिंग स्टेशन परिसरातील कश्यपी उद्यानात गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱ्याचा डाेंगरच तयार झाला अाहे. -निर्मला पाटील, रहिवासी, गंगापूरराेड 
 
एक गाडीही, तीही नियमितपणे फिरत नसल्याची स्थिती 
पालापाचाेळा अाणि वाळलेल्या फांद्यांचा कचरा कुणी उचलायचा असा प्रश्न चार वर्षांपूर्वी उपस्थित झाला तेव्हा त्यासाठी विभागनिहाय गाड्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी प्रत्येक विभागाला प्रत्येकी एक वाहनही देण्यात अाले. हे वाहन दिवसभर कार्यरत राहणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अतिशय कमी वेळ कार्यरत असते. त्यामुळे कचरा महिनांेमहिने पडून राहताे. त्यातून पुढे डास वाढून अाराेग्याचे प्रश्नही वाढतात. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, स्मार्टसिटीत कचऱ्याचे ढीग ...
बातम्या आणखी आहेत...