आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ स्पर्धेत नाशिकचा ठसा, ‘एआयसीटीई’तर्फे हुबळी येथे राष्ट्रीयस्तरीय प्रकल्प स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अखिल भारतीय तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ स्पर्धेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले असून, राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. 
‘एआयसीटीई’तर्फे हुबळी येथे नुकतीच ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ ही राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
 
या स्पर्धेत देशभरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशभरातील २५ केंद्रांतून विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. यात नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी ‘विविध आैषधी वनस्पतींचे भौगोलिक स्थान’ या विषयावर प्रकल्प सादर केला होता. 
 
या स्पर्धेत ३८ प्रकल्पांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविला. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असे पारितोषिक मिळवत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. विद्यार्थ्यांना प्रा. प्रदीप देशपांडे, संचालक शैलेश
 
यांनी मिळवले यश 
‘विविध आैषधी वनस्पतींचे भौगोलिक स्थान’ या विषयावर प्रकल्प तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रभंजन पाध्ये, कौस्तुभ जोशी, शुभम भोकरे, गीतांजली देवरे, अंकिता आहेर, योगिता कासार यांचा सहभाग होता. त्यांना प्रा. गौरव भामरे स्वप्नील घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी एस. पी. ओ. सी. म्हणून प्रा. एन. व्ही. आलोने, समन्वयक म्हणून संगणक विभागातील प्रा. जी. ए. धामणे यांचे मार्गदर्शन लाभले. 
बातम्या आणखी आहेत...