आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट नाशिकसाठी ‘झाेपू’ याेजना, ‘झाेपडपट्टी पुनर्विकास’साठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्ट सिटीतील गावठाण पुनर्विकास शहर झाेपडपट्टीमुक्त करण्यासाठी महापालिकेने अाता सहसंचालक प्रकाश भुक्ते यांच्या स्तरावर मंजूर विकास अाराखड्यात तत्त्वत: मान्य केलेली झाेपडपट्टी पुनर्विकास, अर्थातच एसअारए याेजना नाशिकमध्ये अमलात अाणण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला अाहे. साधारण अाठवडाभरात शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार असून, त्यास मंजुरी मिळाली तर स्मार्ट नाशिकच्या दिशेने प्रवास सुरू हाेईल. 
 
महापालिका क्षेत्रात अाजघडीला पन्नास वर्षांपेक्षा जुन्या अनेक जुन्या इमारती, वाडे अाहेत. जुने नाशिकमध्ये काही प्रमाणात चाळीही अाहेत. त्याचबराेबर शहरात झाेपडपट्ट्यांची संख्याही माेठी अाहे. मध्यंतरी पंतप्रधान अावास याेजनेंतर्गत शहरात झाेपडपट्टीतील लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी सर्वेक्षण झाले. त्यानंतर लाभार्थी निश्चित करून घरकुले बांधण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. शासकीय पातळीवर झाेपडपट्टीमुक्त याेजनेसाठी प्रयत्न सुरू असताना त्यास व्यापक स्वरूप देण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर झाेपडपट्टी पुनर्वसन याेजना राबवण्याची मागणी हाेत हाेती. शहरात अाजघडीला खासगी मालकीच्या अनेक जागांवर विकसकामार्फत नवीन इमारती बांधण्यासाठी धडपड सुरू अाहे. त्यासाठी वाढीव एफएसअाय अन्य सवलतींसाठी झाेपडपट्टी पुनर्विकास याेजना महत्त्वाची हाेती. याच पार्श्वभूमीवर नवीन विकास अाराखडा विकास नियंत्रण नियमावलीत झाेपडपट्टी पुनर्विकास याेजनेसाठी तत्कालीन सहसंचालक भुक्ते यांनी तरतूदही केली. मात्र, पुढे ही तरतूद नवीन नियमावलीत अद्याप मंजूर नसली तरी फेटाळलेली नाही. थाेडक्यात, शासन ही याेजना शहरासाठी मंजूर करायची की नाही या विचारात असल्याचे नगररचना विभागातील सूत्रांचे म्हणणे अाहे. या पार्श्वभूमीवर अाता नगररचना विभागाने ही याेजना मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले असून, लवकरच भुक्ते यांनी प्रस्तावित केलेल्या याेजनेचा संदर्भ नाशिकमधील गरज याबाबत नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार अाहे. 
 
अशी अाहे शहरातील झाेपडपट्ट्यांची स्थिती 
महापालिका क्षेत्रात जानेवारी १९९५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार १०४ झाेपडपट्ट्या अाहेत. या ठिकाणी एक लाख ३५ हजार लाेक राहतात. ५९ झाेपडपट्ट्या अधिकृत असून ४५ अनधिकृत अाहेत. यातील ९० महापालिकेच्या विविध अारक्षित जागांवर अाहेत. ४१ झाेपडपट्ट्या शासकीय जागेवर अाहेत. अधिकृत ५९ झाेपडपट्ट्यांत १६ हजार ९९५ घरे असून अनधिकृत ४५ झाेपडपट्ट्यांत हजार ३८ घरे अाहेत. मुख्य म्हणजे, २० वर्षांनंतर अाता काेठे पंतप्रधान अावास याेजनेच्या पार्श्वभूमीवर झाेपडपट्ट्यांचे पुनसर्वेक्षण सुरू अाहे. 
 
स्मार्ट सिटीसाठी गरजेची याेजना 
महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी याेजना राबवली जात असून या याेजनेत गावठाण पुनर्विकास ही बाब अत्यंत महत्त्वाची अाहे. किंबहुना, गावठाण पुनर्विकास हाच स्मार्ट सिटीचा प्रमुख चेहरा अाहे. गावठाण पुनर्विकासासाठी चार एफएसअायची गरज असून या पार्श्वभूमीवर झाेपडपट्टी पुनर्विकासमधूनच येथील जागा खासगी विकसकामार्फत विकसित करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे झाेपू याेजनेला शासनाकडूनही लवकरच मान्यता मिळेल, असा अाशावाद व्यक्त केला जात अाहे. 
 
काय अाहे झाेपू? 
झाेपडपट्टी पुनर्विकास याेजना खासकरून मुंबईत राबवली जात असून येथे चाळी वा जुन्या गिरणीच्या जागांसारख्या ठिकाणी अतिरिक्त एफएसअाय देऊन घरे देण्यात अाली अाहेत. यात जागामालक तसेच भाडेकरू यांना उंच टाॅवरसारख्या इमारतीत पर्यायी घरे दिली जातात. उर्वरित जागेतील घरे विकसक विकून नफा कमवताे. 
बातम्या आणखी आहेत...