आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्भलिंग निदानासाठी डाॅक्टरने चक्क इनाेव्हा कारमध्ये सुरू केला साेनाेग्राफीचा गाेरखधंदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्त्रीभ्रूण हत्या राेखण्यासाठी कठाेर कायदे लागू केल्यानंतरही लपून गर्भलिंग निदान करण्यासाठी नाशिकच्या सातपूर भागातील एका डाॅक्टरने चक्क इनाेव्हा कारमध्ये गादी टाकून साेनाेग्राफीचा धंदा सुरू केल्याचे उघडकीस अाले अाहे. संबंधित वाहनात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साेनाेग्राफी केंद्रांशी संबंधित यंत्रसाम्रगी व साहित्य अाढळले. या प्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तब्बल अाठ महिने चाैकशी करून साेमवारी सातपूर येथील शाकुंतल डायग्नाेस्टिक सेंटरला सील केले. दरम्यान, याप्रकरणी डाॅ. तुषार पाटील यांच्याविराेधात चार ते पाच दिवसांत गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी  डाॅ. राजेंद्र भंडारी यांनी दिली.


जिल्हा रुग्णालयाच्या ‘आमची मुलगी’ या संकेतस्थळावर डाॅ. तुषार पाटील यांच्याशी संबंधित सातपूर येथील शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वाहनात गर्भलिंग निदान हाेत असल्याची तक्रार अाली हाेती. ही तक्रार महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालयाशी संबंधित असल्यामुळे ती वैद्यकीय विभागाकडे वर्ग करण्यात अाली. पथकाने केंद्राची तपासणी केल्यानंतर पाटील यांच्या इनोव्हा च्या डिक्कीत रुग्णांची सोनोग्राफी करण्याजाेगी परिस्थिती अाढळली. पालिकेच्या पथकाने साहित्य जप्त केल्यानंतर डाॅ. पाटील यांना कारणे दाखवा नाेटीस काढली. त्यात अनेक धक्कादायक बाबी अाढळल्या. दरम्यान, पाटील यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने  त्यांच्यावर कारवाईचा निर्णय पथकाने घेतला. या रुग्णालयातील मशिन सील करण्यात अाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई हाेणार अाहे.


४० अॅम्पचे प्लग कशासाठी?
इनाेव्हासारख्या वाहनात ४० अॅम्पियरचे माेठे प्लग अाढळले. आता याबाबत कदाचित केंद्रांतील साहित्य वाहतुकीच्या नावाखाली सारवासारवही हाेईल. मात्र, हे प्लग जाेडण्यासाठी वाहनात अावश्यक क्षमतेची बॅटरी, यूपीएस तसेच प्लग साॅकेट अाढळल्यामुळे पालिकेचे वैद्यकीय पथकही हादरून गेले. डिक्कीतील गादीवर रुग्णांना झाेपवणे व सोनोग्राफी करण्याचा संशय त्यातून बळावला. दोन प्रोब, सोनी व्हीडिओग्राफिक, लॅपटॉप, उश्या आणि इतर साहित्य आढळले. 

 

१५ हजारांत साेनाेग्राफी
गर्भलिंग निदान चाचण्यांसाठी बंदी असताना मुलगा की मुलगी याबाबत निकाल देण्यासाठी १५ हजार रुपये अाकारले जात असल्याची तक्रार पाटील यांच्याविराेधात अाली हाेती. सहजासहजी काेणाच्या लक्षात येणार नाही व ज्याद्वारे सहसा काेणी पाेहाेचणार नाही या पद्धतीने अाॅनव्हील साेनाेग्राफी हाेत हाेती. या प्रकाराने अाराेग्य यंत्रणा अाश्चर्यचकित झाली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...