आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसअाेएस बनले ‘शाेभेचा डबा’, निश्चित संख्या सांगणे अवघडच...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक राष्ट्रीय महामार्ग हा नेहमीच गजबजलेला असताे. त्यामुळे तेथे अपघात घडणे किंवा अापत्कालीन परिस्थिती उद‌्भवणे हे नेहमीचेच प्रकार. अशा वेळी तातडीने मदत बाेलावण्याची काही सुविधा असावी, म्हणून दाेन वर्षांपूर्वी वाजतगाजत एसअाेएस सेंटर प्रत्येकी एक किलाेमीटरच्या परिघात बसवण्यात अाले. मात्र, या सुविधेचा उपयाेग कसा करायचा तेच सामान्यांना समजत नसल्याने या याेजनेसाठी करण्यात अालेला लक्षावधींचा खर्च निष्फळ ठरला अाहे. विशेष म्हणजे, या एसअाेएस बूथची काेणतीच देखभालही हाेत नसल्याने त्यातील अनेक बूथ म्हणजे रस्त्याच्या कडेवर उभा असलेला ‘शाेभेचा पिवळा डबा’ ठरले अाहेत. त्यावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना स्वत:चा अपघात झाला किंवा तुमच्या समोर एखादा अपघात झालाय किंवा तुमची गाडी बंद पडल्याने ती क्रेनने उचलून रस्त्याच्या कडेला न्यायची आहे, अापल्यावर एखादा हल्ला झालाय आणि पोलिसांची मदत हवी आहे, तसेच कुणीतरी अापल्याला लुटून महामार्गावर टाकून दिले अाहे, तर अशा काेणत्याही अापत्कालीन परिस्थितीत त्यावर ताेडगा म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांवर एसअाेएस बूथची निर्मिती केली हाेती. अशा आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना तातडीने मदतीसाठी सुरू करण्यात अालेल्या या सुविधेचा संबंधित प्रशासनाच्याच उदासीनतेमुळे अन‌् प्रबाेधनाअभावी फारसा उपयाेग झाल्याची उदाहरणे अाढळून येत नाहीत. महामार्गाच्या दोन्ही बाजूने पिवळ्या रंगाच्या डब्यात बसवलेली ही यंत्रणा केवळ शाेभेसाठीची वस्तू बनली अाहे.

यंत्रणेत बदल करण्याची गरज
^अशाप्रकारचीयंत्रणा बसवून तिथे संबंधित माणसाने जाऊन मदतीची याचना करण्याची अपेक्षा या यंत्रणेत अाहे. त्यापेक्षा महामार्गालगतच्या या एसअाेएसमधून त्यांच्या परिघात काही अपघात झाला, अापत्ती उद‌्भवली असल्याचा मेसेज अापसूकपणे नियंत्रण कक्षास पाेहाेचून तिथून मदत त्वरित पाेहाेचेल अशी व्यवस्था करायला हवी. - मंगेश दाणी, नागरिक
ते कसे वापरायचे..?

^हेएसअाेएसवापरायचे कसे, तेच समजत नाही. त्यात अपघात झाल्यावर किंवा काेणतीही अापत्ती अाल्यानंतर संबंधित माणूस प्रचंड घाबरलेला अाणि मनातून हादरलेला असताे. अशावेळी त्यांचा वापर कसा करायचा, ते सांगणारी काही यंत्रणाच जर उपलब्ध नसेल तर त्यांचा उपयाेगच कसा करता येईल? - बाबूराव गुंबाडे, नागरिक

हिंदीत असाव्यात सूचना
^अाम्हीपूर्णदेशभर फिरत असताे. तरीदेखील त्याचा उपयाेग कसा करायचा ते अजूनही समजत नाही. सर्व चालकांना सूचना समजण्यासाठी त्या हिंदीत असणे अावश्यक अाहे. तरच या सेंटरचा काही उपयाेग हाेईल, अन्यथा ते शाेभेचेच ठरेल. - रामभाऊ पंडित, नागरिक

उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह...
वाढत्या माेबाइल संख्येमुळे अाता काेणत्याही अापत्कालीन प्रसंगी माणसे त्यांच्याकडील माेबाइलच वापरतात. अापल्याकडे माेबाइल नसल्यास लगेचच रस्त्यावरून कुणाही व्यक्तीच्या माेबाइलवरून मदत मागितली जाते. त्यात सध्याच्या काळात मदत मागायची असल्यास जे क्रमांक त्यांच्या माेबाइलमध्ये सेव्ह अाहेत, तेवढेच संबंधितांना ज्ञात असतात. त्याव्यतिरिक्त कुणाचेही नंबर तोंडपाठ नसल्याने अन्य नातेवाइक किंवा जवळपासच्या मित्राला फाेन करणेदेखील शक्य हाेत नाही. त्यामुळे या पिवळ्या डब्यांची खरंच गरज हाेती का? हा प्रश्न निर्माण हाेताे.

मदत मागण्यासाठी व्यवस्था...
प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला पिवळ्या रंगाचे डबे दिसतील. तेच खास फोन आहेत. संकटात असल्यास तुम्ही या फोनच्या स्क्रीनवर असलेले ‘पुश टू टॉक’ बटन दाबू शकता. त्यातून बीप आवाज येईल. त्यानंतर हे बटन दाबल्यानंतर व्यक्ती आयआरबीच्या महामार्ग आपत्ती नियंत्रण कक्षाशी थेट संपर्क साधू शकते.पलीकडून नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी तुम्हाला प्रतिसाद देतील मदतीसाठी पुढाकार घेतील, अशी ही व्यवस्था हाेती.

केवळ इंग्रजीत सूचना, तीही अडगळीच्या ठिकाणी...
अनेकएसअाेएस मुळात सुरूच नाहीत. त्यातही ते कसे वापरायचे, याबाबतची सूचना केवळ इंग्रजीतच असल्याने महामार्गाशी सर्वाधिक संबंध असलेल्या ट्रकचालक, टेम्पाेचालकांसारख्या अल्पशिक्षितांना ती अजिबातच समजत नाही. त्यामुळे या बाबी काेणत्याही एसअाेएस बाॅक्सवर हिंदी अाणि स्थानिक मराठी भाषेतदेखील लिहिणे अावश्यक असल्याची भावना अनेक नागरिकांनी बाेलून दाखवली, तरच त्याचा उपयाेग सुलभरीत्या हाेऊ शकेल.
निश्चित संख्या सांगणे अवघडच... राजेश विचारे, अाॅपरेशनल मॅनेजर
एकूणकिती एसअाेएस बसवण्यात अाले अाहेत?
-महामार्गाच्याया प्रकल्पात एकूण ५८ एसअाेएस बसवण्यात अाले अाहेत.

त्यासाठीकिती निधी खर्च झाला अाहे?
-त्याबाबत काेणतीही माहिती सांगता येणार नाही.

त्यांचाकसा उपयाेग हाेत अाहे, महिनाभरातून किती काॅल्स येतात?
-चांगला उपयाेग हाेत अाहे. मात्र, त्याबाबतचा डाटा सांगता येणार नाही. निश्चित संख्या सांगणे अवघड अाहे.

ते निरुपयाेगी असल्याचे लाेकांचे मत अाहे, याबाबत तुमचे काय म्हणणे अाहे?
-लाेकांना उपयाेगी पडण्यासाठीच ते उभे केलेले अाहेत. जनतेने समजून घेऊन त्यांचा उपयाेग करावा, असेच अाम्ही सांगू शकताे.
बातम्या आणखी आहेत...