आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालांत परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस अाजपासून प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्रराज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या शालांत परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, दहावीच्या परीक्षेस नियमित प्रविष्ट होणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पूर्वीचे विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांनी ऑनलाइन अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. त्यासाठी वेळापत्रक जाहीर झाले अाहे. १६ ते २३ अाॅक्टाेबर या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती तयार करावी तसेच विद्यार्थ्यांनी शाळेशी संपर्क साधून अर्ज भरावे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी १७ क्रमांकाचा अर्ज भरला अाहे, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची तारीख नंतर जाहीर हाेईल.
अर्ज भरण्याची प्रक्रिया
शुल्क माध्यमिक शाळांनी बँकेत मंडळास
आवेदनपत्र चलन माहिती
भरावयाची मुदत भरणे देणे
नियमित१९ते ३१ ते १६ ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर
िवलंबते१० १६ ते १९ २३ नोव्हेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर