आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : एसटी कामगारांचे आज चड्डी-बनियन आंदोलन,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - सातवा वेतन आयोग लागू होण्यापर्यंत २५ टक्के अंतरिम वाढ कामगारांना देण्यात यावी, वाढीव महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेतर्फे गुरुवारी (दि. १९) एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर चड्डी-बनियन आंदोलन करून निदर्शने करण्यात येणार आहे. 
 
एसटीच्या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत वाढीव महागाई भत्ता देण्यात आलेला नाही. याबरोबरच १९९६-२००० च्या करारातील कलम १४७ चा भंग करून वेळापत्रक अंमलबजावणीसंबंधात वाहतूक खात्याने एकतर्फी प्रसारित केलेले परिपत्रक रद्द करावे, कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून गणवेश मिळालेले नाही यासह विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेतर्फे एसटी विभागीय कार्यालयासमोर दुपारी १२.३० वाजता निदर्शने करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...