आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतन करार करण्याचा ठराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मान्यताप्राप्त संघटनेच्या बघ्याच्या भूमिकेमुळे सन २००० ते २००८ या कालावधीतील एसटी कर्मचाऱ्यांचे दोन वेतन करार हाेऊ शकले नाही. त्यामुळेच एसटी कामगारांना इतर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी पगार असून गेल्या १६ महिन्यांपासून प्रलंबित असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रवर्गनिहाय २०१६ ते २०२० चा वेतन करार करण्यासाठी विशिष्ट कामगार संघटना वगळून संयुक्त कृती समितीमधील नाेंदणीकृत संघटनांना सहभागी करून घ्यावे, अशा अाशयाचा ठराव संयुक्त कृती समितीच्या प्रादेशिक मेळाव्यात करण्यात अाला. 
 
शालिमार येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण म्हणाले की, सातव्या वेतन अायाेगाचे खाेटे अाश्वासन काही कामगार संघटनांकडून दिले जात अाहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना हा अायाेग लागू हाेऊ शकणार नाही. या अायाेगात केवळ तीन वेतनश्रेणी लागू अाहेत. एसटी कर्मचारी १७ वेतनश्रेणी साेडून तीन वेतनश्रेणी कशा स्वीकारतील, असा सवालही त्यांनी केला. कर्मचाऱ्यांचा वेतन करार मुदत संपल्यानंतर १६ महिन्यांपासून वेतन कराराबाबत १३ बैठका घेऊनही केला जात नाही. यासाठी राज्यस्तरावरील महामंडळात नाेंदणीकृत एसटी कामगार सेनेसमवेत इतर १२ संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करून एसटी प्रशासन, परिवहनमंत्री दिवाकर रावते महामंडळाकडे कामगारांच्या मागण्यांचा मसुदा सादर केलेला अाहे. त्यामुळे वेतन कराराची काेंडी फाेडली असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
यावेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे प्रादेशिक सचिव विष्णू घुले, कास्ट्राइब संघटनेचे अरविंद जगताप, राहुल हिरवे, मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस मोहन चावरे, राष्ट्रवादी प्रणीत संघटनेचे सरचिटणीस डी. आर. पाटील, महेंद्र सावंत, राजू मोझाड, नारायण उतेकरअादी उपस्थित हाेते. 

एसटीचे बजेट कळणारे लाेक पुढारी 
^मान्यताप्राप्त संघटनेच्या अकार्यक्षमतेमुळे कर्मचारी पगारवाढीच्या चक्रव्यूहात अडकला आहे. हा गुंता सोडविणे आता गरजेचे आहे. एसटीचे बजेट कळणारे लोक मान्यताप्राप्त संघटनेचे पुढारी आहेत. -श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस 

नव्या कराराने इतिहास घडावा 
^एसटीलाराज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा सर्वसामान्यांची नित्य सेवा करणारा चालक-वाहक वेठबिगाराप्रमाणे पगार घेतोय. अाता इतिहास घडावा, असा करार करण्याची गरज अाहे. -माेहनजावळे, महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन समिती 

 
बातम्या आणखी आहेत...