आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा विलगीकरण: नाशिक ठरणार राज्यातले पहिले शहर; अजेंड्यावर अाता सर्वात महत्त्वाचा विषय स्वच्छतेचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्र शासनाच्या स्वच्छ शहरात नाशिकची १५१ व्या क्रमांकावर घसरण झाल्यानंतर प्रशिक्षण दाैऱ्यातून अालेल्या अायुक्त अभिषेक कृष्णा यांनीही अापल्या अजेंड्यावर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणून स्वच्छतेची निवड केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी तब्बल दीड तास अाराेग्य विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत अाॅगस्टअखेरपर्यंत संपूर्णपणे अाेला कचरा विलगीकरण करणारे शहर म्हणून महाराष्ट्रात नाशिक पहिले ठरण्याच्या दृष्टीने अावश्यक नियाेजन केले. मे महिनाअखेरीस संपूर्णत: कचरा विलगीकरणाद्वारे संकलित करणारा प्रत्येकी एक प्रभाग शहरातील सहा विभागांना करून देण्याचे उद्दिष्टही त्यांनी दिले अाहे. 
 
स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकचा क्रमांक घसरल्यानंतर अाता शीर्षस्थानाकडे झेप घेण्यासाठी अायुक्तांनी कंबर कसली अाहे. ‘दिव्य मराठी’नेही स्वच्छ शहरासाठी माेहीम सुरू केली असून, सर्वच बाजूने रेटा येत असल्यामुळे महापालिकेचीही जबाबदारी वाढली अाहे. या पार्श्वभूमीवर अायुक्तांनी महिनाभरानंतर पालिकेची सूत्रे घेतल्यानंतर प्रथम स्वच्छतेच्या विषयावर लक्ष केंद्रित केले. अाराेग्यधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांच्यासह स्वच्छता निरीक्षकांच्या बैठकीत घरातून अाेला सुका कचरा कसा वेगळा येईल. घंटागाडीत त्यांचे कशा पद्धतीने विभाजनाद्वारे संकलित हाेईल. खत प्रकल्पावर येथे स्वतंत्र प्रक्रिया कशी हाेईल, अाेला सुका कचरा घरात वेगळा करण्यासाठी नागरिकांना अावाहन करण्याबराेबरच क्रेडाईसारख्या माेठ्या संस्थांकडून अावश्यक साहित्य अन्य मदत कशी देता येईल याबाबतही नियाेजन केले. 
 
प्रत्येकाकडे येणार शाैचालय : स्वच्छ भारत अभियानांतर्गत उघड्यावर एकही शाैचास बसणार नाही याचे नियाेजन केले जात अाहे. त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करून काेणाकडे शाैचालय नाही, ज्यांच्याकडे शाैचालय नाही त्यांच्याकडे बांधकामासाठी जागा अाहे की नाही जागा नसल्यास सामूहिक शाैचालयाद्वारे त्यास कसे सामावून घेता येईल याबाबत सर्वेक्षण करणार अाहे. काेणत्याही कारणाखाली शाैचालय नसेल यादृष्टीने प्रयत्न असेल. 
 
तर अाराेग्यधिकाऱ्यासह अतिरिक्त अाराेग्यधिकारी निलंबित : डिसेंबर महिन्यात घंटागाडीच्या नवीन ठेक्याचे कामकाज सुरू झाले असून एप्रिल महिना उजेडल्यानंतरही अनेक घंटागाड्यात अाेला सुका कचरा संकलनाची व्यवस्थाच नसल्याचे अाढळले अाहे. विशेष म्हणजे, महापाैरांच्या दाैऱ्यात ही बाब उघड झाल्यानंतरही अाराेग्यधिकारी डाॅ. विजय डेकाटे कारवाईबाबत फारसे गंभीर नसल्याचे अाढळले हाेते. मात्र अायुक्त कृष्णा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही बाब गांर्भीयाने घेत अाराेग्यधिकारी डाॅ. देकाटे अतिरिक्त अाराेग्यधिकारी डाॅ. सचिन हिरे यांना अल्टीमेटम दिला. मंगळवारी सायंकाळपर्यंत उभयंतांनी किती घंटागाड्यात अाेला सुका कचऱ्याची व्यवस्था नाही त्यावर काय कारवाई केली याबाबत अहवाल दिल्यास त्यांना निलंबनाची पावले उचलली जाणार असल्याचे अायुक्तांनी स्पष्ट केले. 
 
यापुढे बांधकाम प्रकल्पातच स्वतंत्र व्यवस्था 
क्रेडाईसह शहरातील प्रमुख बांधकाम वास्तुविशारद संघटनांची बैठक ११ मे राेजी अायुक्तांनी बाेलावली असून, त्यात प्रामुख्याने बांधकाम प्रकल्प तयार करतानाच येथे अाेला सुका कचरा संकलनासाठी वेगळी व्यवस्था करता येईल का? याबाबत चर्चा केली जाणार अाहे. 
 
मिशन स्वच्छतेत प्रत्येकाला सामावून घेणार 
अाॅगस्ट अखेर पर्यंत कचरा अाेला सुका या पद्धतीने स्वतंत्र संकलित करून अशा पद्धतीने कचरा व्यवस्थापन करणारे महाराष्ट्रातील नाशिक हे पहिले शहर बनवण्याचा मानस अाहे. त्यासाठी सर्व नाशिककरांना सहभागी करून घेतले जाणार अाहे. हे काम केवळ महापालिकेचे नसून प्रत्येकाची ती जबाबदारी अाहे, अशी भावना निर्माण केली जाणार अाहे. या कामात सीएसअार अॅक्टिव्हिटीतून अावश्यक साधनसामग्री नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार अाहे. जेणेकरून कचऱ्याची व्यवस्थित साठवणूक ते करू शकतील. माेठ्या उद्याेजकांना यासाठी मदतीला घेतले जाणार अाहे. खत प्रकल्पावर अादर्श घनकचरा व्यवस्थापन केले जाणार असून, जे जे शक्य अाहे ते प्रकल्प भले अटी-शर्तीत नसले तरी विनंती करून कार्यान्वित करून घेतले जातील. वैयक्तिक शाैचालय याेजनेसाठी स्वतंत्र सर्वेक्षण करून शहर हागणदारीमुक्त केले जाईल. -अभिषेक कृष्णा, अायुक्त, महापालिका 
 
असे अाहे मिशन 
शहरातील सहा विभागातील प्रत्येकी एक प्रभाग मेअखेरीस अाेला सुका कचरा स्वतंत्ररित्या संकलित करणारा म्हणून दाखवून द्यावा लागेल. जून अखेरीस शहरातील ५० टक्के कचरा अाेला सुका स्वतंत्र रित्या संकलन दाखवून द्यावे लागेल. त्यानंतर जुलै अखेरीस संपूर्ण शहरात अाेला सुका कचरा स्वतंत्ररित्या संकलित करून प्रक्रियेपर्यंतचे टार्गेट असेल. त्यानंतर एक महिना तळापर्यंत जाऊन खराेखरच त्याची अंमलबजावणी हाेते की नाही याची पाहणी करून अंतिमत: संपूर्णत: कचरा विलगीकरण करणारे नाशिक शहर अाहे की नाही याची घाेषणा केली जाणार अाहे.
 
खत प्रकल्पात प्लास्टिकपासून इंधन निर्मिती 
खत प्रकल्पात प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार अाहे. खत प्रकल्पाच्या ठेक्यात त्याबाबत अट नाही, मात्र ठेकेदाराशी केलेल्या चर्चेनुसाह हा प्रकल्प सुरू हाेणार अाहे. जे इंधन तयार हाेईल त्यातून मृत जनावरांना जाळणारी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार अाहे. याबराेबरच अाेल्या कचऱ्यापासून उत्तम दर्जाचे कंपाेस्ट खत तयार केले जाणार असून पहिल्या टप्प्यात खताची जी काही प्रतवारी वा गुणवत्ता समाेर अाली ती सरकारी मानकानुसार असल्याचाही दावा अायुक्तांनी केला. 
 
दरम्यान, सुक्या कचऱ्यापासून गरजेनुसार कांडी काेळसा वा इंधन वीटा तयार केला जाणार असून यात कांडी काेळशाला अधिक मागणी असल्याने त्यावर भर दिला जाणार अाहे. थाेडक्यात शहरातील घनकचऱ्याचे संपूर्णत: व्यवस्थापन करण्यावर भर असणार अाहे. याव्यतिरिक्त येथे कचरा माेजण्यासाठी अाॅटाे वे ब्रीज, सीसी कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली असल्याचे सांगितले.  
 
 
बातम्या आणखी आहेत...