आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंगसह फार्मसीच्या २१ हजार जागांसाठी ३३ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे इंजिनिअरिंग फार्मसी या पदवी प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या विहित मुदतीत वाढ करण्यात आली होती. त्यानुसार १८ जूनपर्यंत इंजिनिअरिंगसाठी १९ हजार १९६ तर फार्मसीसाठी १४ हजार १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले आहे. नाशिक विभागातील २१ हजार जागांसाठी ३३ हजार २०९ प्रवेश अर्ज आल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद लाभला आहे. 
 
डीटीईतर्फे इंजिनिअरिंगसह फार्मसी पदवीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी विहित मुदतीत वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत सायंकाळी वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता आले. इंजिनिअरिंसाठी अंतिम गुणवत्ता यादी २२ जूनला जाहीर होईल. त्यानंतर २२ ते २६ जून रोजी पहिल्या कँप राऊंडसाठी यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना पहिली अलॉटमेेंट २८ जून रोजी जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जुलैपर्यंत एआरसी सेंटरवर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. त्याचप्रमाणे जुलै महिन्यात दुसऱ्या तिसऱ्या फेरीसाठी कँप राऊंड जाहीर होतील. इंजिनिअरिंगसाठी सर्व फेऱ्यांचे प्रवेश हे जून ते १४ ऑगस्ट या कालावधित पार पडणार आहे. डीटीईच्या संकेतस्थळावर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

२१ हजार जागांसाठी ३३ हजार प्रवेश अर्ज 
नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये शासकीय, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या एकूण ८७ एवढी आहे. त्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची ४९ महाविद्यालयांत १९ हजार १८० जागा आहेत. फार्मसीच्या ३८ महाविद्यालयात २६९० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या २१ हजार ८७० जागांसाठी ३३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले आहेत. 

आर्किटेक्चरसाठी २० जूनपर्यंत मुदत 
आर्किटेक्चर प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाची नोंदणी करण्यासाठी डीटीईतर्फे २० जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ६४० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रांची तपासणी करण्याचे आवाहन डीटीईतर्फे करण्यात आले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...