आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकांविराेधात धाेरण बनवणारेच देशद्राेही; विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारचा भाजपवर अासूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘राममंदिर कधी बांधले जाणार, ताजमहाल काेणी बांधला किंवा राणाप्रताप जिंकले हाेते की मोगल,  हे वर्तमानातील प्रश्न नाहीत. राेहित वेमुलाच्या अाईला अाजपर्यंत न्याय का नाही मिळाला, शेतकरी अात्महत्या का थांबत नाहीत अाणि त्याच शेतकरी अाणि मजुरांच्या मुलांना अातंकवादी, नक्षलवादी का ठरवले जात अाहे, महिलांवरील अत्याचार का थांबत नाहीत, हे वर्तमानातील प्रश्न अाहेत. जे लाेक देशातील लाेकांविरुद्ध धाेरणे तयार करीत अाहेत, तेच देशद्राेही अाहेत,’ असा अाराेप करत स्टुडंट्स‌ फेडरेशन अाॅफ इंडियाचे अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी रविवारी भाजप सरकारवर आसूड ओढला.   

नाशिकमध्ये तूपसाखरे लाॅन्स येथे झालेल्या संविधान जागर सभेत कन्हैयाकुमार बाेलत हाेते. ‘नाेटाबंदीनंतर ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांना चाेर म्हटले जाते. मग कराेडाेंचे कर्ज बुडवणारा विजय मल्ल्या काय सदाचारी अाहे का? भाजपच्या केंद्रातील सत्तेला साडेतीन वर्षे पूर्ण हाेत असून या काळात १९ वेळा  गॅसच्या किमती वाढवल्या. एका बाजूला सामान्यांना गॅसची सबसिडी साेडण्याचे अावाहन केले जाते, मात्र उद्याेजकांसाठी हजाराे काेटींचे बेल अाऊट पॅकेज सरकार देतेय. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून साडेतीन लाख काेटींचे काळेधन देशात अाणल्याचे सांगतात, मात्र बुलेट ट्रेनकरिता जपानकडून एक लाख काेटींचे कर्ज का घेतले हे सांगत नाहीत,’ असे कन्हैया यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...