आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या मातांना मिळाल्या पाैष्टिक अाहाराच्या टिप्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम प्राथमिक शाळेत पालक-शिक्षक संघ आयोजित माता मेळावा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. पाल्यांना वाढवताना त्याचे पोषण योग्यरीत्या व्हावे म्हणून हेल्दी टिफिन्स’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या मातांना पाैष्टिक अाहारासाठीच्या टिप्स देण्यात अाल्या. 
 
नाशकातील प्रख्यात अाहारतज्ज्ञ मयूरी सहस्त्रबुद्धे-जोशी यांचे व्याख्यान त्यासाठी आयोजित करण्यात आले होते. त्यात त्यांनी मुलांना विविध पोषणमूल्ये कसे मिळतील, त्यासाठी काही पाककृती दाखवून मातांना मार्गदर्शन केले. सदर पाककृती करण्यात पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
 
यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका राधा मुतालिक-देसाई, माँटेसरी विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता वाळवेकर, पालक-शिक्षक संघाच्या कार्याध्यक्षा अॅड. सायली गोखले, स्वाती सिंग, अमोल कर्पे सर्व पालक-शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील पाल्यांच्या सुमारे ७०० माता उपस्थित होत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...