आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक - जवानाच्या आत्महत्येचे गूढ वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
नाशिक-  देवळाली कॅम्प येथील तोफखाना विभागातील लष्करी जवान डी. एस. रॉय मॅथ्यूजच्या अात्महत्या प्रकरणातील गूढ वाढले असून, आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. 
या प्रकरणी तिसऱ्या दिवशी अफवा पसरल्या होत्या. जवानाने अात्महत्या कोर्ट मार्शलच्या भीतीने केली असली तरी नेमक्या कुठल्या कारणाने त्याचे कोर्ट मार्शल होणार होते, याचे कारण गुलदस्त्यात अाहे.
 
शनिवारी सोशल मीडियावरील एका साईटवर जवानाचा व्हिडिअो व्हायरल झाला. मात्र, याबाबत पोलिसांना काहीच माहिती नसल्याने अाणखी पेच वाढला. पोलिसांकडून जवानाचे सहकारी, अधिकारी तसेच नातेवाइकांचे जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू अाहे.
 
यामध्ये काही माहिती हाती लागण्याची शक्यता असून, पोलिस त्यादृष्टीने तपास करत अाहेत. 
सहायक अायुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू अाहे. दरम्यान, जवानाचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला असून, त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात अाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...