आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेटवून घेत, नस कापून एकाची मंदिराला प्रदक्षिणा घालत अात्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - अंगावर राॅकेल अाेतून घेत पेटवून घेतले. त्यानंतर घरासमोरील गणपती मंदिरात जाऊन हाताच्या नसा कापून घेत प्रदक्षिण घालत एकाने आत्महत्या केल्याची घटना जेलरोड परिसरात रविवारी (दि. १८) पहाटे पाचच्या सुमारास घडली. याबाबत नाशिकरोड पोलिसात नाेंद करण्यात अाली अाहे. 
 
याबाबत पोलिसांना दिलेली माहिती अशी की, जेलरोड येथील सुभाष रामराव डोईफोडे (५८, रा. अविष्कार अपार्टमेंट, माॅडेल काॅलनी) यांनी आर्थिक चणचणीला कंटाळून आत्महत्या केली. डोईफोडे यांनी अंगावर राँकेल ओतून घेत पेटवून घेतले. शरीराचा दाह हाेवू लागल्याने त्यांनी घरासमाेरील गणपती मंदिरात जावून हाताची नस कापून घेतली. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा घालत असतानाच ते काेसळले. यावेळी देवाकडे मला वाचव अशी त्यांनी याचना केल्याेचे नागरिकांनी सांगितले. 

 
बातम्या आणखी आहेत...