आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या, कच्चा सुताच्या दोरीने घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिकरोड - नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मध्यवर्ती कारागृहात शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कारखाना विभागातील चर्मकार विभागाच्या कच्चा मालाच्या गुदामात डॅनी ऊर्फ हरपालसिंग कृपालसिंग चौधरी (३१) या कैद्याने कच्चा सुताच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. डॅनी हा हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. त्याचा ६४१६ बंदी क्रमांक होता. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे हे तपास करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...