आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात मंदिराला प्रदक्षिणा घालत एकाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक  - नाशिकच्या जेल रोड येथील माॅडेल काॅलनीतील सुभाष रामराव डाेईफाेडे  यांनी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घरात स्वत:च्या अंगावर राॅकेल अाेतून घेत पेटवून घेतले. त्यानंतर घरासमोरील गणपती मंदिरात जाऊन हाताच्या नसा कापून घेत मंदिराला प्रदक्षिणा घालत आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नाेंद करण्यात अाली अाहे.    

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी, जेल रोड येथील माॅडेल काॅलनीतील आविष्कार अपार्टमेंटमध्ये राहाणारे सुभाष रामराव डोईफोडे (५८) यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली. याबाबत त्यांचा मुलगा हितेश डोईफोडे याने नाशिक रोड पोलिसांना माहिती दिली.  सुभाष डोईफोडे यांनी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. मात्र, आगीने शरीराचा दाह हाेऊ लागल्याने त्यांनी घरासमाेरील गणपती मंदिरात जाऊन हाताच्या नसा कापून घेतल्या. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. या वेळी रक्त मंदिराच्या भिंतींवर उडाले. प्रदक्षिणा घालत असतानाच ते काेसळले. यात त्यांचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...