आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरणाने गतिमंद मुलांच्या वर्तन-अाराेग्यात सुधारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - जन्मत:च गतिमंद असल्याने कोणाला चालता, तर कोणाला बोलता येत नाही... कोणी पायामध्ये वाकलेले, तर कोणी पाठीमध्ये.. कोणाचा चालताना थरकाप होताे, तर काेणी दुसऱ्याच्या आधाराने पायऱ्या चढताे... अशा शारीरिक व्याधींसह काहींची मानसिक स्थितीही बिघडलेली. हट्टीपणा, पालकांना जुमानणे यामुळे त्यांचा सांभाळ कठीण झालेला असताना जलतरण मदतीला धावून अाले. डाॅक्टरांनी या मुलांच्या पालकांना पोहण्याच्या व्यायामामुळे वर्तनात अाराेग्यात सुधारणा होऊ शकते, असा सल्ला दिला. त्यानुसार पालकांनी येथील जलतरण तलावावर आणल्यानंतर मुलांमध्ये झपाट्याने सुधारणा झाली. सुरुवातीला काही मुलांनी पाणी पाहूनच ओरडायला सुरुवात केली. तर काहींनी पाण्यात उतरण्यास थेट नकारच दिला. त्यामुळे पालक आणि तरण तलाव प्रशिक्षकांच्या नाकीनऊ आले. पण, तरण तलावाच्या व्यवस्थापक माया जगताप, प्रशिक्षक अनिल निगळ दिलीप मोरे यांनी हार मानली नाही. त्यांना पालकांनीही साथ दिली. तीन-चार दिवसांनंतर तरण तलाव, प्रशिक्षक आणि येथे पोहण्यास येणाऱ्या सामान्य मुलांकडे पाहून या मुलांची पाण्याची भीती कमी होऊ लागली. हळुहळू त्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात अाला. आता ही सर्व सोळा मुले पोहण्यामध्ये तरबेज तर झाली आहेत. शिवाय, त्यांच्यामध्ये माेठी सुधारणा झाल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले. पंचवटी, पेठरोड, म्हसरूळ, जत्रा हाॅटेल, इंदिरानगर, जेलरोड, विहीतगाव, जय भवानी रोड, डीजीपीनगर या परिसरातून नित्याने ही मुले पोहण्यासाठी येतात. 

वर्षभरापासून ही मुले नित्याने पोहण्याचा व्यायाम करीत असल्याने त्यांची चिडचीड बंद झाली आहे. ती अाता कमी बोलतात, स्वत:हून काेणाच्याही मदतीशिवाय पायऱ्या चढतात, दुसऱ्याजवळ जाऊन शांतपणे उभे राहतात, पालकांनी सांगितलेले त्वरित आत्मसात करतात. ज्यांचा चालतानाही थरकाप व्हायचा ती मुले आता पळू लागली आहेत. पाठीमध्ये आणि पायामध्ये बाक आलेली मुले आता सरळ उभी राहू लागली आहेत. त्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आता तो एकटाच पायऱ्या चढतो 
^माझ्या मुलाला एक पायरी चढण्यासाठी आमचा आधार लागायचा. मात्र, आता तो सातत्याने पोहण्याचा व्यायाम करीत असल्याने एकटाच पायऱ्या चढू लागला आहे. तसेच, पोहण्यामुळे त्याच्या पाठीतील बाक नाहीसा झाला आहे. -राखी दुसाने, पालक 
 
साईश दुसाने, अनघा खर्चे, पियूष जगदाळे, समर्थ नागरे, आयुष्या श्रीवास्तव, साक्षी देशमुख, प्रतिक बुवा, सोहम देशमुख, हर्षद सावंत, पूजा पेंढारकर, नील मोरे, चेरी शर्मा, हर्ष ओव्हळ, विधान अग्रवाल 

ही मुले जिद्दीने शिकली जलतरण 
^गतिमंदमुलांनापोहणे शिकवताना सकारात्मकता, संयम दाखवत मेहनत करावी लागली. मला या क्षेत्रात काही तरी वेगळे करायचे होते. त्यामुळे हे मी अाव्हान म्हणून स्वीकारले. त्यांच्यामध्ये पूर्णपणे सुधारणा झाल्याचे समाधान अतिशय माेठे आहे. -अनिल निगळ, प्रशिक्षक 

मुलगी शांत होऊन पूर्णत: सुधारणा 
^माझी मुलीचा स्वभाव रागीट होता. त्यामुळे मनाला येईल तसे ती वागत होती. एक वर्षापासून पोहण्याचा व्यायाम करीत असल्याने ती आता शांत झाली अाहे. तिच्यामध्ये पूर्णत: सुधारणा झाली आहे. -दीपाली खर्चे, पालक 

पोहण्याचा व्यायाम सर्वांसाठी उपयुक्त 
^जलतरणाचा व्यायाम शरिरासाठी सर्वाधिक उपयोगी आहे. पोहण्यामुळे शरिरातील प्रत्येक अवयवाचा व्यायाम होऊन शारीरिक व्याधी कमी हाेतात. ताे सर्वांनीच केला पाहिजे. -माया जगताप, व्यवस्थापक, तरण तलाव 

पार केला दोन किलोमीटरचा समुद्र 
नाशिकरोड येथील गतिमंद मुलांनी मालवण, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. तर मालवण येथे सागरी जलतरण स्पर्धेमध्येही सहभागी होऊन दाेन किलोमीटर समुद्र पार केला. 
 
बातम्या आणखी आहेत...