आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या थकबाकीदारांच्या अाठ मालमत्ता जप्त, २० जनांककडून २६ लाखांची दंडवसुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अार्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम एक महिना बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कर विभागाने वसुलीसाठी अाक्रमक पवित्रा घेत बुधवारी (दि. १०) अाठ मालमत्ता जप्त करून सील केल्या, तर २० थकबाकीदारांनी जागेवरच २६ लाख ५७ हजार ९२ रुपये दंड भरला.
करदात्यांची उदासीनता महापालिकेच्या बेफिकिरीमुळे करवसुलीचे उद्दिष्ट काेलमडण्याची भीती हाेती. या पार्श्वभूमीवर कर विभागाने धडक माेहीम हाती घेऊन बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय घेतला हाेता. त्यासाठी शहरातील सहाही विभागात बुधवारी धडक कारवाई करण्यात अाली. प्रत्येक विभागातून दाेन याप्रमाणे १२ थकबाकीदारांपर्यंत पाेहाेचण्याचा प्रश्न हाेता. प्रत्यक्षात कारवाई सुरू झाल्यानंतर २८ थकबाकीदारांपर्यंत पालिकेचे पथक गेले. यावेळी उपायुक्त राेहिदास दाेरकुळकर, सहायक अायुक्त जयश्री साेनवणे, विलास जाधव, मनाेज संगमनेरे, विभागीय अधिकारी साेमनाथ वाडेकर, ए. पी. वाघ, अार. अार. गाेसावी, चेतना केरूरे, वसुधा कुरणावळ यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित हाेते.

या मिळकती सील
चिंतामणीकन्स्ट्रक्शन्सचे दाेन गाळे, झुलेलाल नागरी पतसंस्था, रचना ट्रस्ट, दिलीप पाठक, राज डेव्हलपर्स, भीमराव साळवे, मनाेज किसनानी, बाळकृष्ण गायकवाड
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशी झाली कारवाई....