आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : सॅनिटरी नॅपकिनवरील कर हटवा; उत्पादकांचीही मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व इतर महिलांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. - Divya Marathi
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व इतर महिलांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
नाशिक  - सॅनिटरी नॅपकिनवर लावण्यात आलेला १२ टक्के जीएसटी कर हटवण्याची मागणी आता राज्यातील महिला संघटना आणि विरोधी पक्ष यांच्यासोबत उत्पादकही करू लागले आहेत. याबाबत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकार याबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.  
‘जीएसटी’च्या आधी महाराष्ट्रात सॅनिटरी नॅपकिन ६ टक्के कर होता. अाता १२ टक्के जीएसटी प्रस्तावि आहे. अजूनही ८० टक्के महिला अज्ञान, किंमत व अनुपलब्धतेमुळे नॅपकिन वापरत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून याबाबतची सजगता वाढत असताना जीएसटीमुळे त्यांच्या किमती वाढल्या तर पुन्हा नॅपकिनचा वापर घटेल आणि त्याचा महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, अशी महिला संघटनांची तक्रार आहे.  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. सौंदर्य प्रसाधने करमुक्त, मग सॅनिटरी नॅपकिनवर कर का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. किमती वाढल्या नॅपकिनच्या वापरात घट होईल आणि महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
मनेका गांधींशी चर्चा
- महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. देशातील सर्वच स्तरांतील महिलांना सॅनिटरी नॅपकिन किफायतशीर दरात किंवा मोफत उपलब्ध व्हावेत, असे आम्हालाही वाटते. याबाबत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. लवकरच सरकार  बदलाचा निर्णय घेईल, अशी आशा आहे.  
विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग  
 
अत्यल्प नफाही घटेल  
- ज्यांना परवडते त्या महिलांसाठी दोन-पाच रुपयांची वाढ मोठी नाही; परंतु ज्यांना परवडत नाही अशा महिलांमध्ये स्वच्छतेच्या जागरूकतेमुळे पॅड्स वापरण्यास सुरुवात झाली होती. १२ टक्के कर लागला तर त्यांच्या मागणीत निश्चितच घट होईल. त्यामुळे त्यात सवलत देण्याची आमची उत्पादक म्हणून मागणी आहे.  
हितेंद्र निकम, उत्पादक, नाशिक.
 
जीएसटीमुळे नॅपकिनच्या किमतीत अशी हाेईल वाढ  
१० रुपयांचे पॅड- १२.५० रुपये, १५ रु. चे पॅड- १८ रुपये,२० रु.चे पॅड- ३० रुपये.
बातम्या आणखी आहेत...