आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा, साडेसात मीटर रस्त्यांवरील टीडीआर अद्यापही बासनातच, असा करता येईल टीडीअारचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्य शासनाने २८ जानेवारी २०१६ राेजी काढलेल्या टीडीअारशी संबंधित अध्यादेशातील काही तरतुदींमध्ये दुरुस्तीपत्रकाच्या माध्यमातून बदल करण्यास मंजुरी मिळाली असून, अाता एकाच रस्त्यावरील विविध अाकाराच्या भूखंडांवर एकाच प्रकारचा टीडीअार लाेड करता येणार अाहे. शहरात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या सहा साडेसात मीटर रस्त्यावरील टीडीआर धोरणात बदलाचा कोणताही उल्लेख या दुरुस्तीपत्रकात नसल्याने याबाबतचा संभ्रम मात्र अद्यापही कायम आहे.

शासनाच्या मूळ अध्यादेशात भूखंडाच्या अाकारानुसार कमी जास्त टीडीअार लाेड करण्याचे बंधन घातले गेले हाेते. या आणि अशाच प्रकारच्या अन्याय्य तरतुदींचा शहरातील विविध राजकीय पक्ष आणि विविध संघटनांकडून कडाडून विराेध झाला. लाेक रस्त्यावरही उतरले हाेते आणि यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या हाेत्या. म्हणून शासनाला या धाेरणात व्यवहारिक बदल करणे क्रमप्राप्त वाटले म्हणून काही सुधारणा, नियमावली तयार करून शुद्धीपत्रकाद्वारे ते प्रकाशित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात अाले आहे. या दुरुस्तीपत्रकावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरीदेखील केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली अाहे.

राज्य शासनाने ३० एप्रिल २०१५ राेजी मूळ अधिसूचना, नवीन भूसंपादन कायद्यान्वये अारक्षित जागांचा माेबदला कसा द्यावा, यासाठी टीडीअार संदर्भातील मूळ अधिसूचना काढली हाेती. त्यात टीडीअार अाणि सर्वसमावेशक अारक्षणे या दाेन प्रकरणांचा समावेश करण्यात अाला हाेता. त्यावर सूचना आणि हरकतींची प्रक्रिया राबविल्यानंतर २८ जानेवारी २०१६ राेजी टीडीअारशी संबंधित अध्यादेश शासनाने प्रसिद्ध केला होता. त्यात मूळ प्रस्तावित धाेरणात अन्यायकारक बाबींचा समावेश अायत्यावेळी करण्यात अाला. त्यात, जुना टीडीअार, नवीन नियमाप्रमाणे इडेक्शित करून रेडीरेकनरप्रमाणे मूल्यांकन करून नवीन िनयमाप्रमाणे वापराची सक्ती अशा तरतुदींचा समावेश करण्यात अाला. मीटर त्यापुढील रुंदीच्या रस्त्यांच्या भूखंड क्षेत्रफळाचे वर्गीकरण करून कमी अधिक टीडीअार वापरण्याची परवानगी देण्यासह रस्त्याखालील अारक्षणाच्या क्षेत्राला कंपाउंड करण्याची गरज नसतानादेखील, कंपाउंडच्या खर्चापाेटी १५ टक्के वजावट देण्याची तरतूद, हे तीन मुख्य बदल करण्यात आले होते.

यामध्ये पायाभूत सुविधा सुधारीकरण मूल्य (इन्फ्रास्ट्रक्चर इन्प्रुव्हमेंट चार्जेस) रेडीरेकनरमधील बांधकाम दराच्या पाच टक्के इतके अधिमूल्य आकारण्याची सक्ती करण्यात अाली. मात्र, बहुतांश महापालिकांतील भूखंड अभिन्यास (ले-अाउट) अाणि ७.५ मीटर रस्त्यांवरच मंजूर झालेले हाेते, त्यापैकी बहुतांश ले-अाउट अाजही रिकामे पडलेले अाहेत. त्यावर टीडीआर लोड करणे शासनाने अचानक रद्द केले होते.

अशा चुकीचे बदल अन्यायकारक तरतुदींना कडाडून विराेध झाला. न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. म्हणून शासनाला या धाेरणात व्यवहारिक बदल करणे क्रमप्राप्त वाटल्याने त्याबाबत काही सुधारणा नियमावली तयार करून शुद्धीपत्रकाद्वारे एमअारटीपी कायद्याचे कलम १५४ अन्वये सदरहू बदल करत प्रकाशित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात अाले अाहे. त्यावर त्यांनी स्वाक्षरीही केल्याचे समजते.

शुद्धीपत्रकाद्वारे मंजूर धाेरणात झालेले बदल :
रस्त्याखालील अारक्षणाचा टीडीअार देताना कंपाउंड करण्याच्या अटीद्वारे १५ टक्के टीडीअारची वजावट करावी, अशी जाचक अट घालण्यात अालेली हाेती. ही अट रद्द करून त्यांना संपूर्णपणे टीडीअार देण्याचे मंजूर करण्यात अाले अाहे. या धाेरणातील िनयम क्रमांक ५.४.१ नुसार मीटर ते ३० मीटर रस्त्यांवर-मूळ अधिनियमात हा टीडीअार गावठाण दाटीवाटीच्या भागात (नाशिकमध्ये साधारणतः टी. पी. भाग) मध्ये वापरण्याचे अनुज्ञेय करण्यात आले हाेते. परंतु, नाशिक महापालिकेत टीडीअारच्या जुन्या धाेरणाप्रमाणे मुख्य रस्त्यांवर (जसे काॅलेजराेड, त्र्यंबकराेड, नाशिक-पुणे राेड, मुंबई-अाग्राराेड इत्यादी) ४० मीटर खाेलीपर्यंत टीडीअार वापरणे अनुज्ञेय नव्हते. ही अट नवीन अधिनियमात पुन्हा घालण्यात अालेली अाहे. रि-डेव्हलपमेंट प्लाॅट मागणी शासनाकडून मान्य करण्यात आली अाहे. मंजुर अधिनियमातील नियम क्रमांक, (अ) नुसार जुना टीडीअार हा जुन्या झाेनप्रमाणे वापरण्यात मंजूरी िदली अाहे. परंतु, सदरहू, वापर एक वर्षांच्या अात करणे बंधनकारक केले अाहे.

२८ जानेवारी २०१६ च्या पुर्वी जे टीडीअार विक्री झालेले अाहेत (६ ७.५ मीटर रस्त्यांवर) परंतू, ज्यांचे इमारत नकाशे मंजुरीसाठी पालिका स्तरावर प्रलंबित अाहेत, त्या सर्व प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या खरेदी खतामध्ये स्पष्टपणे प्लाॅट नं., सर्व्हे क्रमांकाचा उल्लेख असल्यास त्यांना टीडीअार वापरण्यास अनुज्ञेय केले अाहे.
७.५ मीटर रस्त्यावर टीडीअार नाहीच
मुख्यमंत्र्यांनीस्वाक्षरी केलेल्या या शुद्धीपत्रकात अाणि ७.५ मीटर रस्त्यावर टीडीअारच्या वापराबाबत काहीच उल्लेख करण्यात अालेला नसल्याने या रस्त्यांवर शुद्धीपत्रकानंतरही अाता टीडीअार वापरता येणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर सर्वाधिक राेष असल्याचे पहायला मिळत हाेता, मात्र शुद्धीपत्रकातही अपेक्षित बदल केला गेला नसल्याने पुन्हा एकदा हा राेष अनुभवायला मिळणार अाहे.

सर्वसमावेशक धाेरणालाही मंजुरी
३० एप्रिल २०१५ च्या प्रारूप धाेरणात जे सर्वसमावेशक अारक्षणांचे धाेरण मंजुरीसाठी प्रलंबित हाेते, त्यावरही मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली अाहे.
बातम्या आणखी आहेत...