आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : विमानसेवा सर्वेक्षणात मिळाली दिल्ली, मुंबई अन‌् गाेव्यास पसंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमान कंपन्याच्या सर्वेक्षणात नागरिकांनी नोंदविलीली पसंती - Divya Marathi
विमान कंपन्याच्या सर्वेक्षणात नागरिकांनी नोंदविलीली पसंती
नाशिक - नाशिक मधूनदेशांतर्गत प्रवासी विमानसेवा सुरू व्हावी याकरीता विमान कंपन्यांनी मागविलेल्या माहितीचे संकलन करण्यासाठी सुरू करण्यात अालेल्या सर्वेक्षणाला अवघ्या दाेनच दिवसात सहा हजार नाशिककरांनी प्रतिसाद दिला. या सर्वेक्षणानुसार अातापर्यंत नाशिकवरून कुठल्या शहरासाठी विमानसेवा हवी या प्रश्नावर नाशिककरांनी मुंबईला पहिली पसंती दिली अाहे. दिल्ली अाणि गाेव्याला यानंतरची पसंती मिळाली अाहे. बंगळुरू-नाशिक-िदल्ली अशी हाेपिंग फ्लाईट असावी, ही नाशिककरांची पहिली पसंती ठरली अाहे. हे सर्वेक्षण २० एप्रिलला संपणार असल्याने विमानसेवा अपेक्षित असलेल्या नाशिककरांनी जिल्हावासियांनी सर्वेक्षणात भाग घेणे अपेक्षित अाहे. 
 
तीन वर्षांपासून नाशिक विमानतळाची अद्ययावत इमारत उभी अाहे, मात्र येथून प्रवासी विमानसेवा सुरू झालेली नाही, मुळात गरज असतांना पुरेशी क्षमता असतांनाही नाशिकहून विमानसेवा सुरू हाेत नसल्याने ही सेवा सुरू व्हावी यासाठी सर्व पातळ्यांवर नाशिकच्या अाैद्याेगिक इतर संघटनांना साेबत घेवून खासदार हेमंत गाेडसे इतर काही लाेकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करीत अाहेत. यापूर्वी एक सर्वेक्षण करून विमान कंपन्यांना सर्वेक्षणाची माहिती देण्यात अाली हाेती. मात्र यावर काही काळ शांत राहीलेल्या विमान कंपन्यांनीच अाता विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मकता दर्शवित नाशिककरांना नक्की कुठल्या शहरांकरीता? विमानसेवा हवी अाणि कुठल्या शहरांना जाेडणाऱ्या ‘हाेपिंग फलाईटस‌््’ अपेक्षित अाहेत,अशी माहीती मागविली अाहे. याकरीता पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येत असून यात नाशिक शहर जिल्ह्यातील नागरीकांनी https://goo.gl/m0TJJA या लिंकवर जावून पाच प्रश्न त्याची उत्तरे देणे अपेक्षित अाहेत. १२ एप्रिलला खुल्या झालेल्या या सर्वेक्षणाला १४ एप्रिल दुपारी चारपर्यंत ५३०० नागरिकांनी सहभागी हाेत मागणी नाेदविली अाहे.  
 
पुढील स्लाईडवर वाचा, सर्वेक्षणातील प्रश्न उत्तरांच्या पर्यायांना मिळालेली मते... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...