आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 11 शासकीय रुग्णालयांत 574 सशस्त्र सुरक्षा रक्षकांची नियुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक - रुग्णांच्या नातेवाईकांकडून डाॅक्टरांवर हाेणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व निवासी डाॅक्टरांनी पुकारलेल्या संपाची दखल घेत शासकीय रुग्णालयांत सशस्त्र सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात अाला अाहे. निवृत्त पाेलिस महासंचालकांच्या समितीकडून त्याची त्वरीत अंमलबाजवणीदेखील करण्यात अाली. त्याअंतर्गत पाच ठिकाणच्या ११ रुग्णालयांमध्ये ५८४ सशस्त्र सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी ३० काेटींचा निधी देखील तातडीने मंजूर करण्यात अाला अाहे. उर्वरित ११ ठिकाणच्या रुग्णालयांत दुसऱ्या टप्प्यात सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येतील. 
 
धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जी झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या नातलगांनी डाॅक्टरांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाणीमुळे संबंधित डाॅक्टरांची प्रकृती गंभीर झाल्याने उपचारार्थ त्यास मुंबईला हलविण्यात आले होते. मुंबईच्या केईएम रुग्णालयांतही अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या. त्याचेच पडसाद राज्यभरात उमटले अाणि सरकारी तसेच खासगी रूग्णालयातील निवासी डाॅक्टर बेमुदत संपावर गेले होते. 
 
याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संपकरी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाच्या मागण्या पूर्ण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिश महाजन यांनी निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली हाेती. या समितीने राज्यातील महत्वाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालये अाणि संलग्न रुग्णालयांची पाहणी करीत पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणच्या ११ रुग्णालयांत सुमारे ५८४ सशस्त्र सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. शासनाने त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याची याेग्य अंमलबाजवणी हाेते की नाही, याचा अाढावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डाॅ. सुरेश बारपांडे हे घेणार अाहेत. 

लवकरच हाेणार ११०० सुरक्षा रक्षकांची नियुक्ती 
विशेषम्हणजे प्रत्येक सुरक्षा रक्षक हा प्रशिक्षित असून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाकडूनच त्यांची नियक्ती करण्यात आली अाहे. यापाठाेपाठ अाणखी १० रुग्णालयांमधील स्थितीचा आढावा घेण्यात अाला अाहे. लवकरच त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्वच्या सर्व रुग्णालयांत एकूण ११०० सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. 
 
सर्वच सुरक्षा रक्षक प्रशिक्षित 
- मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये तातडीने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आलेे आहेत. त्यासाठी पुरेसा निधीही मंजूर अाहे. महत्वाचे म्हणजे सर्व सुरक्षा रक्षक हे प्रशिक्षित अाहेत.
-प्रवीण दीक्षित, अध्यक्ष, निवासी डॉक्टर सुरक्षितता समिती 
 
पुढील स्लाईडवर वाचा, नाशिकसह १८ ठिकाणी पोलिस आणि या रुग्णालयांना मिळाली सुरक्षा  
या रुग्णालयांना मिळाली सुरक्षा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...