आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीसीपीअार रखडल्याने अायुक्तांवर दबाव, शासनाकडून मार्गदर्शन मिळेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका क्षेत्रातील २० वर्षे विकासाचे नियाेजन असलेली विकास नियंत्रण नियमावली जानेवारीस मंजूर करूनही प्रत्यक्षात अमलात अाणल्यामुळे माेठा पेच निर्माण झाला असून, फेब्रुवारीनंतर नवीन नियमावलीही नाही जुन्या नियमावलीचीही मुदत संपली असल्यामुळे बांधकाम परवानग्यांना ब्रेक लागला अाहे. अशा स्थितीत शहरातील नवीन बांधकामांचे काय करायचे यावरून अायुक्तांकडे तगादा सुरू झाला असून, राज्य शासनाकडून अाचारसंहितेच्या नावाखाली या नियमावलीबाबत वेळकाढूपणाची भूमिका घेतली जात असल्यामुळे महापालिकेची काेंडी झाल्याचे चित्र अाहे. दरम्यान, क्रेडाईसह बांधकाम विकसकांच्या संघटनांनी अायुक्तांची भेट घेऊन नियमावलीची विचारणा केली; मात्र ‘शासनाकडून मार्गदर्शन मागितले अाहे’, या उत्तरापलीकडे अायुक्तांनाही फार काही सांगता अाले नाही. 
 
महापालिका क्षेत्रातील इंचन्इंच बांधकामाचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या विकास नियंत्रण नियमावलीची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा अाहे. जुन्या विकास नियंत्रण नियमावलीची मुदत २०१६ मध्ये संपली; मात्र नवीन नियमावली येईपर्यंत त्यानुसारच बांधकाम परवानग्या दिल्या जात हाेत्या. जानेवारीस राज्य शासनाने विकास अाराखडा विकास नियंत्रण नियमावलीला मंजुरी दिली. त्यानंतर महिनाभरानंतर, म्हणजेच फेब्रुवारीपासून नवीन नियमावली अंमलबजावणी अपेक्षित हाेती. प्रत्यक्षात, महापालिकेला नवीन नियमावलीच प्राप्तच झाल्यामुळे फेब्रुवारीनंतर नगररचना विभागाचे कामकाज ठप्प झाले अाहे. नवीन बांधकाम परवानगीचे अर्ज स्वीकारायचे की नाही, असा पेच हाेता. मात्र, याबाबत नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताेंडी सूचना दिल्यानंतर अर्ज स्वीकारण्याचे ठरले; मात्र जुन्या नियमावलीची संपलेली मुदत नवीन नियमावलीबाबत संदिग्धता यामुळे राज्य शासनाचे मार्गदर्शन घेण्यासाठी सहायक संचालक अाकाश बागुल यांना पाठवले गेले. प्रत्यक्षात त्यांच्याही हातात ठाेस असे काहीच पडले नाही. दरम्यान, विकास नियमावली जाहीर हाेत नसल्यामुळे क्रेडाईसह बांधकाम व्यावसायिक विकसकांची संघटना, पदाधिकाऱ्यांनी अायुक्त अभिषेक कृष्णा यांची साेमवारी भेट घेतली. या भेटीत त्यांनी नियमावलीबाबत विचारणा केल्यावर अायुक्तांनी शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. 
 
पालिका निवडणुकीत राजकारण तापणार 
विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरातील गावठाण, तसेच लहान रस्त्यावरील घर बांधकाम विस्तारीकरणात येणारे अडथळे, मूळ नाशिककरांना शहराबाहेर हटवण्याचा घाट असे मुद्दे महापालिका निवडणुकीत तापण्याची शक्यता अाहे. खासकरून शिवसेना, मनसे राष्ट्रवादीने या मुद्यावरून रान पेटवण्याची तयारी केली अाहे. भाजपसमाेर नियमावली जाहीर करण्याशिवाय पर्यायच उरलेला नसून १८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री जाहीर सभेत कसा प्रतिकार करतात, हे बघणे महत्त्वाचे अाहे.
 
व्हायरल नियमावली वाटू लागली खरी... 
नाशिक शहरातील नऊ मीटरखाली असलेल्या बहुतांश मिळकतींना मारक अशी विकास नियंत्रण नियमावली मध्यंतरी व्हायरल झाली. भाजपनेही नियमावली खाेटी असल्याचे सांगत ती पसरवणाऱ्यांच्या चाैकशीचे अादेश दिले; मात्र ही नियमावली खाेटी असल्याचे खाेडून काढण्यासाठी खरी नियमावली अाणण्याचे धाडस ते दाखवू शकले नाही. त्यामुळे अाता व्हायरल नियमावलीच खरी असल्याचा समज दृढ हाेत असून, बांधकाम विकसकांनीही तशीच प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे अधिकारी सांगत अाहेत. 
 
नाशिकबाबतच उणे का; हाच प्रश्न 
पुणे तेथे काय उणे’, असे म्हटले जाते त्याचा प्रत्यय नाशिकमधील विकसक घेत अाहेत. पुणे महापालिका निवडणुकीची अाचारसंहिता सुरू असून, या कालावधीतही तेथील विकास नियंत्रण नियमावली जाहीर झाली. मात्र, नाशिक महापालिका क्षेत्रातील नियमावली मात्र अाचारसंहितेच्या मुद्यावरून जाहीर हाेत नसल्याचे कारण दिले जात अाहे. पुण्यासाठी वेगळा नियम नाशिकसाठी वेगळा, यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. 
 
जुन्या नियमानुसार दाेनशे प्रकरणे 
जुन्या विकास नियमावलीनुसार फेब्रुवारीपर्यंत दाखल दाेनशे बांधकाम परवानगीची प्रकरणे निकाली काढावी, अशीही मागणी विकसकांनी केली. दरम्यान, फेब्रुवारीनंतर नवीन बांधकाम परवानगीची प्रकरणे महापालिकेने दाखल करण्याचे ठरवले अाहे; मात्र दाखल केल्यानंतर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी काेणत्या नियमावलीच्या अाधारे करायची, याबाबत त्यांच्याकडे काेणतेही उत्तर नाही. नगरविकास खात्याच्या काेंडीमुळे महापालिका गाेठून गेल्याचे चित्र अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...