आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुने नाशिकमध्ये दंगलीची अफवा, परिसरात कडक बंदाेबस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक - जुन्या नाशकात महापालिका निवडणूक मतमोजणीनंतर गुरुवारी (दि. २३) काही ठिकाणी दगडफेक वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर शनिवारी (दि. २५) चौकमंडई परिसरात एका वृद्ध महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. गुरुवारी तोडफोडीच्या दरम्यानच मारहाण झाल्याने या वृद्धेचा मृत्यू झाल्याची तसेच जुन्या नाशकात दंगल झाल्याची अफवा पसरविण्यात आल्याने परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला होता. 
 
गुरुवारी (दि. २३) जुन्या नाशकात प्रभाग १४ मधील पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी राग व्यक्त करत सारडा सर्कल, चौकमंडई, बागवानपुरा या भागात तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेक वाहनांची तोडफोडीच्या घटना घडल्याने चौकमंडई, बागवानपुरा सारडा सर्कल आदी भागात तणाव निर्माण झाला होता. उर्वरित.पान 
 
वृद्धेचा आजारानेच मृत्यू.. 
- संबंधित महिलेचा गुरुवारी झालेल्या तोडफोडी हाणामारीत कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. काही लोकांनी निवडणुकीचा राग म्हणून अशा अफवा पसरवत मृत्यूला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोस्टमार्टेम केल्यानंतर रिपोर्टमध्ये त्यांना दमा, रक्तदाब काही दिवसांपासून ताप, जुलाब आदी आजार होते. यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
-सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे 
 
बातम्या आणखी आहेत...