आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफाेड्या, चाेरीच्या घटनांचा अालेख उंचावला; ‘भयमुक्तनाशिक’ संकल्पना नावालाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धार्मिक शहराबराेबरच एज्युकेशनल हब म्हणून नावारूपास अालेल्या नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांचा अालेख मात्र गेल्या काही वर्षांपासून चढताच अाहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अायुक्तांकडून विविध उपक्रम राबविले जात अाहेत. त्यात नाकाबंदी, काेम्बिंग अाॅपरेशन, वाहन तपासणी यांसह व्हाॅट्सअॅपवर तक्रारी स्वीकारणे, सायकलगस्त, विशेष पाेलिसगस्त, नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद, प्रबाेधनपर कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचा समावेश अाहे. मात्र, यातील बहुतांश उपक्रम केवळ कागदावरच राहिल्याने अाजघडीला दराेडे, घरफाेड्यांचे प्रमाण शहरातील वाढले असल्याचे अाकडेवारीवरून दिसून येते. गुरुवारी शहरातील ती मंदिरांतील दानपेट्या फाेडून चाेरी झाल्याच्या घटना घडल्या. तर याच दिवशी मध्यरात्री तब्बल सहा ठिकाणी घरफाेड्या झाल्या. यापूर्वीही गेल्या काही महिन्यांत घरफाेडीच्या अनेक घटना घडल्या अाहेत. शहरातील रहिवासी भागात पोलिसांची कुठलीही भीती बाळगता भर दिवसा घरफोडीचे प्रकारही घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांमुळे पोलिस प्रशासनापुढे आव्हान उभे ठाकले असून, त्याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
साेनसाखळी चाेरीच्या घटनाही वाढल्या
वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून वाहन तपासणी, नाका बंदी मोहीम राबविण्यात येतात. मात्र, दुसरीकडे सोनसाखळी चाेरीच्या घटना वाढतच आहेत. यंदा जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात सोनसाखळी चोरीच्या तब्बल ८३ घटना घडल्या आहेत, गेल्या वर्षी सोनसाखळी चोरीच्या ७४ घटना घडल्या होत्या.

मंदिरांच्या दानपेट्यांवरही चाेरट्यांचा डल्ला
घरफोडीच्याघटनांबरोबरच मंदिरांतील दानपेट्याही फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. गुरुवारी आडगावमधील मारुती मंदिर, शनिमंदिर आणि महालक्ष्मी मंदिरात चोरी झाली. या प्रकारामुळे शहरातील मंदिरेही सुरक्षित नसल्याचे दिसून येते.

रविवार कारंजा येथील पाेलिस चाैकी अशाप्रकारे पाेलिसांच्या प्रतीक्षेत असते. तर, महाराणा प्रताप चाैकातील पाेलिस चाैकीला गुदामाचे स्वरूप प्राप्त झाले अाहे. हे चित्र शहरातील अनेक पाेलिस चाैक्यांत दिसते.

पोलिसगस्त नसल्याच्या तक्रारी
‘भयमुक्त नाशिक’ संकल्पना राबविण्यासाठी पोलिसांकडून जाेरदार प्रयत्न सुरू असताना वाढत्या गुन्हेगारी घटना, टवाळखोरांचा खुला वावर यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितताच आहे. अनेक भागात रात्री पोलिस गस्तच होत नसल्याच्या तक्रारी ‘डी.बी. स्टार’कडे अाल्या आहेत. पोलिस प्रशासनाने मोठा गाजावाजा करून सायकलगस्त अन् नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद संकल्पना राबवली. मात्र, सध्या तिलाही मरगळच अाली आहे. गस्तीसाठी मिळालेल्या अनेक सायकली अाजघडीला धूळखातच पडलेल्या असल्याचे चित्र अाहे.

‘आपला शेजारी खरा पहारेकरी’चे काय?
गेल्या काही दिवसांपासून शहरात रात्री अाणि दिवसाही घरफोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. बंद घरे, बंगल्यांवर पाळत ठेवून गुन्हेगार डाव साधत असल्याचे समाेर अाले अाहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, या संकल्पनेबाबत जनजागृतीच हाेत नसल्याने तिही फारशी प्रभावी ठरत नसल्याचेच दिसून येते. नागरिकांनीही अापण बाहेरगावी जाताना शेजारच्यांना वा पाेलिसांना माहिती कळवणे गरजेचे असताना प्रत्यक्षात तसे हाेत नसल्याने अनेकदा चाेरटे डाव साधत असतात.

शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये माेठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. २०१६ वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यांचा विचार केला, तर शहरात दिवसा घरफोडीचे तब्बल ३२ गुन्हे घडले असून, त्यापैकी केवळ अाठच गुन्हे उघडकीस अाणण्यात पाेलिस प्रशासनाला यश अाले आहे; तर रात्रीच्या वेळी घरफोडीच्या १८१ घटना घडल्या असून, त्यापैकी ४३ घटना उघडकीस आणण्यात पाेलिस प्रशासनाला यश अाले आहेेत. गेल्या वर्षीच्या घटनांची तुलना केल्यास गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणात काहीसी वाढ झाली असली, तरी गुन्हेगारी घटनांतही लक्षणीय वाढच झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाेलिसगस्त वाढविण्याची मागणी हाेत अाहे.

वाहनचोरीच्या घटनाही ठरताहेत डाेकेदुखी
घरफोडी,सोनसाखळी चोरीच्या घटनां पाठोपाठ वाहनचोरीच्या वाढत्या घटनाही पोलिस प्रशासनासाठी डाेकेदुखी ठरत अाहेत. जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात ४१४ वाहन चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेेत. त्यापैकी ८१ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे, तर गेल्या वर्षी वाहनचोरीच्या तब्बल ४५८ घटना घडल्या होत्या, त्यापैकी केवळ ६६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते.

बंद पोलिस चौक्या कधी होणार सुरू?
शहरातील विविध रहिवासी भागांत प्रशासनाकडून पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र, यापैकी काही पोलिस चौक्या फक्त देखाव्या पुरत्याच असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बंद पोलिस चौक्या सुरू करून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

पोलिसगस्त वाढविण्यावर भर देणार
घरफाेड्या, चाेरीच्या घटनांचा अालेख उंचावला; ‘भयमुक्तनाशिक’ संकल्पना नावालाच
गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ‘जैसे थे’, मात्र गुन्ह्यांत हाेतेय वाढ; रात्रीच्या सुमारास
पाेलिसांची गस्त वाढविण्याची नागरिकांकडून हाेतेय मागणी
शहरात दिवसेंदिवस वाढतच असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून ‘भयमुक्त नाशिक’ संकल्पना राबवली जात असली तरी वाढत्या सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहनचाेरी तथा अन्य चाेरीच्या घटनांमुळे सध्या तरी ‘भययुक्त नाशिक’ असेच काहीसे चित्र अाहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष गस्त, सायकल पेट्राेलिंग, नागरिकांशी प्रत्यक्ष सुसंवाद, प्रबाेधन यांसारख्या गाेष्टी मात्र अल्पावधीतच दुर्लक्षित झाल्याने भरवस्तीत दराेडा, खून, चाेरी करण्याचे धारिष्ट्य गुन्हेगारांकडून केले जात अाहे. तीन मंदिरांतील दानपेट्या फाेडण्याची अाणि एकाच रात्रीत सहा घरफाेड्यांची घटना तसेच गेल्या वर्षभरातील दिवस रात्रीच्या घरफाेड्यांची वाढती संख्या पाहता पाेलिस प्रशासनाची नाचक्की स्पष्टपणे अधाेरेखित हाेते. त्यावर ‘डी.बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
सचिन गोरेे, पोलिसउपायुक्त
{ शहरात गेल्या काही दिवसांत घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या अाहेत. काय कारण?
-गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटना कमी अाहेत. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
{शहरातील काही भागांत पोलिस चौक्या बंदच असतात. त्या सुरू करण्याबाबत काय उपाययोजना करणार?
-पाेलिस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे शहरातील अनेक पोलिस चौक्या बंद अाहेत. त्या सुरू करण्याबाबत सध्या अडचणी येत आहेत.
{रहिवासी भागात सायकल गस्त बंदच असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचे काय?
-रहिवासी भागात सुरू करण्यात अालेली सायकल गस्त अाजही नियमित सुरू आहे. तसेच, नागरिकांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे. जेणेकरून घरफाेड्या, लुटमार, साेनसाखळी चाेरीच्या घटनांचा अालेख कमी हाेऊ शकेल.
{घरफाेड्यांचे प्रमाण वाढतेय, अशा परिस्थितीत रात्रीची पाेलिसगस्त वाढवणार का?
-हाेय, वाढत्या घरफाेड्यांमुळे अाता शहरातील विविध भागांमध्ये रात्रीची पाेलिसगस्त वाढविण्यावर भर दिला जाईल.
बातम्या आणखी आहेत...