आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या विरोधात गुन्हा, पिस्तूल जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरट्यांनी लामरोड येथे तोडलेले चंदनाचे झाड - Divya Marathi
चोरट्यांनी लामरोड येथे तोडलेले चंदनाचे झाड
नाशिक - देवळाली कँम्प येथील लीलावती सोसायटीत चंदनाचे बारा फुटाचे झाड तोडून नेल्याचा प्रकार घडला आहे. इंदिरा नगर पोलिसात चंदन चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
लामरोडच्या दक्ष नागरीकांमुळे पोलिसांना माहीती ही मिळाली. पोलिस येण्याअगोदर चोरटे पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिस त्यांचा पाठलाग करत असतांना ते ईंदिरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दित गेल्याने कंट्रोलवरुन माहिती देण्यात आली. इंदिरा नगर पोलिसात चंदन चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून कार आणि पिस्तूल हे साहित्य जप्त केले आहे. अशी माहीती देवळाली पोलिसांकडुन मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...