आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाखांची लाच घेताना दुय्यम निबंधक अहिरेसह तिघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे (साक्री)- साक्री तालुक्यातील दिघावे येथील दूध डेअरी जमीन खरेदीसाठी सहा लाखांची मागणी करून तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारणाऱ्या तिघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. दुय्यम निबंधक परशराम अहिरे, लिपिक अशोक सोनकांबळे दीपक ठाकूर अशी त्यांची नावे आहेत. चक्क दोन लाखांपर्यंत लाच मागण्याची गेल्या दोन वर्षातील ही पहिलीच घटना आहे. 
 
तालुक्यातील खासगी दूध डेअरी चालवणाऱ्या कंपनीच्या संचालकास कंपनीच्या नावे काही जमीन तीन एकर जमीन स्वतःच्या नावे खरेदी करावयाची होती. आपल्या मित्रांसोबत खरेदी जमिनीची नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले. या व्यवहाराची नोंद करण्यासाठी तेथील कार्यालयाचे प्रमुख या वेळी दुय्यम निबंधक परशराम काशिनाथ अहिरे (५०), कनिष्ठ लिपिक अशोक ईश्वरलाल सोनकांबळे (४८) यांनी संंबंधित खरेदीदाराकडे सहा लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे खरेदीदार यांनी ३१ जानेवारी रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 
 
या तक्रारीनंतर लाचलुचपत पथकाने पडताळणी केल्यावर अहिरे सोनकांबळे यांनी मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुरुवारी दुपारी या पथकाने साक्री येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार हे कार्यालयात आले असता प्रभारी दुय्यम निबंधक परशराम अहिरे लिपिक अशोक सोनकांबळे यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती दीपक कृष्णा ठाकूर याला दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
 
 शिवाय दोन लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली. पथकाचे उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पवन देसले, कैलास शिरसाठ, संतोष हिरे, देवेंद्र वेंदे, संदीप सरग, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडिले, किरण साळी, प्रकाश सोनार, मनोहर ठाकूर, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, संदीप कदम यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लाचलुचपत पथकाने पडताळणी केल्यावर अहिरे सोनकांबळे यांनी मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुरुवारी दुपारी या पथकाने साक्री येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार हे कार्यालयात आले असता प्रभारी दुय्यम निबंधक परशराम अहिरे लिपिक अशोक सोनकांबळे यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती दीपक कृष्णा ठाकूर याला दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. शिवाय दोन लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली.
 
 पथकाचे उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पवन देसले, कैलास शिरसाठ, संतोष हिरे, देवेंद्र वेंदे, संदीप सरग, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडिले, किरण साळी, प्रकाश सोनार, मनोहर ठाकूर, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, संदीप कदम यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
बातम्या आणखी आहेत...