आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: मतदानासाठी ‘जम्बो’ बंदोबस्त, साडेचार हजार पोलिसांचा ताफा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिका निवडणूक मतदानासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी (दि. २१) मतदानाच्या दिवशी १४०८ बूथवर पोलिसांचा जम्बो बंदोबस्त तैनात राहणार आहे. शहरातील ५४८ इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया होणार असून, या सर्व घडामाेडींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सोमवारी (दि. २०) सकाळी आठ वाजता पोलिस बंदोबस्तात मतदान इव्हीएम मशिन बूथनिहाय रवाना केले जाणार आहेत. 
 
मनपा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. या सर्व निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासनास निर्देश देण्यात आले आहे. 
 
मतदानाच्यादिवशी मतदान केंद्रावर आणि शहर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याकरिता शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानावर पोलिसांची करडी नजर राहणार असून, याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त विजय पाटील, दत्ता कराळे, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, डॉ. राजू भुजबळ, अतुल झेंडे, मोहन ठाकूर, जयंत बजबळे यांच्यासह १४ सहायक आयुक्त बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आहेत. ७६ निरीक्षक आणि २०७ उपनिरीक्षकांसह २५८३ पोलिस कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. गृृहरक्षक दलाचे १७०० जवान बंदोबस्ताकामी सज्ज ठेवण्यात आले आहेत. यासह एसआरपीएफ, क्यूआरटी, आरसीपीच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचे कडक पालन करण्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. 
 
असा राहील बंदाेबस्त : संवेदनशील५७ मतदानकेंद्रावर परिमंडळ चे ५२ कर्मचारी, पोलिस ठाण्याचे १३, पोलिस आयुक्तांचे एक पथक, उपआयुक्त पथक, सहायक आयुक्तांचे पथक, १३ वरिष्ठ निरीक्षकांचे स्वतंत्र पथक आणि क्यूआरटी, आरसीपीचे पथक संवेदनशील मतदान केंद्रासह इतर मतदान केंद्रावर गस्त करणार आहे. 
 
असा आहे बंदोबस्त 
उपआयुक्त,१६ सहायक आयुक्त, ७६ निरीक्षक, २०७ उपनिरीक्षक, २५८३ महिला पुरुष कर्मचारी, १७ होमगार्ड, एसआरपीएफ, क्यूआरटी, आरसीपीच्या दोन दोन तुकड्या. 

निर्भयपणे करा मतदान 
- महापालिका निवडणुकीच्या दोन दिवस आधी आणि मंगळवारी मतदानाच्या दिवशी शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. मतदारांना कुठेही प्रलोभन आणि मद्याचे अामिष दाखवले जात असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा. मदतीसाठी नागरिकांनी पोलिसांचे सहकार्य घ्यावे.
-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
 
प्रलोभनावर करडी नजर 
उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना मद्य आणि विविध प्रलोभनं देण्याची शक्यता आहे. तसेच, मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनांचा वापर होत असल्यास संबंधित उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रविवार आणि सोमवार मध्यरात्रीपर्यंत छुप्या प्रचारावर इच्छुकांकडून लक्ष्मीदर्शन प्रलोभन देण्याची दाट शक्यता असल्याने या घडामोडींवर पोलिसांची करडी नजर राहील. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...