आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन नाशिक’करिता तीन केंद्रीय मंत्र्यांना साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘मेकइन नाशिक’चे वारे अाता वेगाने वाहू लागले असून, मे महिन्यात हाेणाऱ्या या उपक्रमाला उपस्थित राहण्याकरिता केंद्रीय मंत्र्यांनाही अामंत्रित करण्यात अाले अाहे. या उपक्रमाला भेट देण्यासाठी केंद्रीय भुपृष्ठ रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू अाणि अवजड उद्याेगमंत्री अनंत गिते यांना अामंत्रित करण्यात अाले अाहे. खासदार हेमंत गाेडसे अाणि निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सचिव ज्ञानेश्वर गाेपाळे अाणि उपक्रमाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांनी दिल्लीत जाऊन अामंत्रित केले अाहे. या तिन्ही मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, ‘मेक इन नाशिक’ला ते भेट देण्याची शक्यता अाहे. यामुळे या तिन्ही मंत्र्यांकडे असलेल्या महत्त्वाच्या खात्यांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला केंद्र सरकारकडूनही चालना मिळू शकणार अाहे. 
 
नाशिकमध्ये अाैद्याेगिक गुंतवणूक यावी याकरीता ३० अाणि ३१ मे राेजी मुंबईच्या वरळीतील नेहरू सेंटर येथे ‘मेक इन नाशिक’चे अायाेजन करण्यात अाले अाहे. राज्य शासनानेही याकरीता हातभार लावला असून, माेठ्या उद्याेगांनी यात सहभागी व्हावे याकरिता अाता सरकारी पातळीवरूनही प्रयत्न सुरू झाले अाहेत. याकरीता अाढावा बैठकांना सुरुवात झाली असून, मंगळवारी मुंबईत उद्याेगमंत्री सुभाष देसाई अाणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. अाता लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक हाेणार अाहे.
 
दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनीही या उपक्रमाला भेट द्यावी याकरिता प्रयत्न सुरू झाले असून, निमाच्या शिष्टमंडळासह खासदार हेमंत गाेडसे यांनी दिल्लीत मंत्र्यांना निमंत्रणे दिली अाहेत. या मंत्र्यांच्या भेटीमुळे नाशिकला कागद कारखाना किंवा रेल्वेचा कारखाना असा एखादा माेठा प्रकल्प मिळावा, अशी अपेक्षा अाहे. 
 
‘मेक इन नाशिक’करिता केंद्रीय मंत्री तसेच उद्याेगपतींना अामंत्रण देण्यात अाले असून या उपकमातून नाशिकमध्ये माेठी गुंतवणूक अाणण्याचा प्रयत्न अाहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ‘मेक इन नाशिक’करिता अामंत्रित करताना खासदार हेमंत गाेडसे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सचिव ज्ञानेश्वर गाेपाळे, उपक्रमाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर. 
बातम्या आणखी आहेत...