आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अाज अंतिम दिवस, गुरुवारी दुपारपर्यंत 420 अर्ज दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शुक्रवारची (दि.३) अखेरची मुदत असून दुपारी वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार अाहेत. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत २८५ उमेदवारी अर्ज दाखल झाले मात्र यात प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचा संबंध नव्हता. शिवसेना, भाजपासह काँग्रेस-राष्ट्रवादीची यादी जाहीर नसल्यामुळे, तर मनसेने सायंकाळी यादी जाहीर केल्यामुळे अाता शुक्रवारीच काेण काेण अधिकृतरित्या रिंगणात उतरते हे बघणे महत्त्वाचे अाहे. 
 
महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्यास फेब्रुवारीपर्यंत मुदत असली तरी, मुळात यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सर्वच राजकीय पक्षांची अडचण झाली अाहे. उमेदवार देताना बंडखाेरी हाेणार नाही, याचीच दक्षता अधिक घ्यावी लागत असल्यामुळे याद्या जाहीर झालेल्या नाही.
 
गुरुवारी शिवसेना, भाजपासह अन्य पक्षांचा तिढा सुटून उमेदवारी अर्ज दाखल हाेईल अशी अपेक्षा हाेती. प्रत्यक्षात काेणत्याही पक्षाची यादी वेळेत जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार रिंगणात अाले नाही. दरम्यान, दुपारपर्यंत २८५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ४२० उमेदवारी अर्ज २७ जानेवारी ते गुरुवारी दुपारपर्यंत दाखल झाले अाहेत, तर अाॅनलाइन २९६७ अर्ज दाखल झाले. 
 
एबी फाॅर्म थेट अधिकाऱ्यांना देता येणार 
यंदाखासकरून शिवसेना भाजपला बंडखाेरीचा फटका बसण्याची भीती अाहे. या पार्श्वभूमीवर थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्याची खेळी शहराध्यक्ष करण्याच्या तयारीत अाहेत. एबी फाॅर्म थेट निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकृत करू शकतात, त्यासाठी उमेदवारच असला पाहिजे अशी अट नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शहराध्यक्ष वा पक्षाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडून अर्ज स्वीकारला जाईल असे उपायुक्त विजय पगार यांनी स्पष्ट केले. 
बातम्या आणखी आहेत...