आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या डाॅ. हितेंद्र महाजन यांनी पूर्ण केली भूतानमधील ‘डेथ रेस’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भूतानमध्ये शनिवारी रात्री संपलेली ‘टूर ड्रॅगन’ ही सायकलस्वारांची परीक्षा पाहणारी ‘डेथ रेस’ डाॅ. हितेंद्र महाजन यांनी शनिवारी रात्री पूर्ण करीत नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खाेवला अाहे. २०१२ मध्ये सायकलच्या तांत्रिक बिघाडाने अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नाचा पुन्हा वर्षांनी पाठलाग करीत डाॅ. महाजन यांनी २७० किलाेमीटरचे अत्यंत बिकट घाटांनी भरलेल्या रस्त्याचे अंतर १८ तासांत पूर्ण करीत स्वत:बराेबरच नाशिक सायकलिस्टचे माजी अध्यक्ष जसपालसिंग यांच्या स्वप्नाचीही पूर्तता केली. हिमालयाचे राैद्ररूप दाखवणारा अद‌््भुत निसर्ग, चढ-उतार असलेले खडकाळ आणि मातीचे रस्ते अाणि प्रचंड काठिण्य पातळी असल्याने स्पर्धकांची शारीरिक अाणि मानसिक परीक्षा बघणाऱ्या या डेथ रेससाठी नाशिकचे रॅम ’वीर डॉ. हितेंद्र महाजन अाणि नाशिकचे सायकलपटू किशोर काळेसुद्धा सहभागी झाले हाेते. मात्र, तेथील हिमवर्षावामुळे भरलेल्या प्रचंड थंडीने (हिव-हायपरथर्मिया ) काळे यांनी २४० किलाेमीटर अंतर पार केल्यानंतर शर्यत साेडून दिली. मात्र, डाॅ. हितेंद्र यांनी त्यांचा धडाका कायम राखत बराेबर १८ तासांत ही २७० किलाेमीटरची ‘डेथ रेस पूर्ण केली . 
 
२०१२ चे अपयश धुवून टाकले : २०१२मध्ये या रेसमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टर बंधूंपैकी महेंद्र महाजन यांनी रेस पूर्ण केली होती. मात्र, तांत्रिक समस्येमुळे डॉ. हितेंद्र यांना निर्धारित वेळेत पोहाेचणे शक्य झाले नव्हते. तरीदेखील त्यांनी ही शर्यत पूर्ण केली होती. त्यावेळी राहिलेली उणीव भरून काढत ही स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी अपयशाचा डाग पुसून टाकला. तसेच नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांना या यशस्वी स्वारीने एक अनाेखी श्रद्धांजली वाहिली अाहे. या टूरसाठी डाॅ. महाजन यांना जायंट्स स्टारकेनचे सीईअाे प्रवीण पाटील यांचे सहकार्य अाणि प्रायाेजकत्व लाभले हाेते. 
 
अशी असते टूर ड्रॅगन : हिमालयीनपर्वतरांगांत होणारी ही जगातील सर्वात कठीण स्पर्धा आहे. एका दिवसात सलग ४० किमीपेक्षा जास्त अंतराचे तीन घाट पार करताना सलगपणे २७० किलाेमीटरचे अंतर पार करायचे असते. त्यातील मोठे चढ आणि उतार सायकलिस्टची परीक्षा बघत असतात. कडाक्याची थंडी, अाॅक्सिजनचे सातत्याने बदलते प्रमाण, पावसामुळे वाहून गेलेले रस्ते अशातून अविश्रांत सायकल चालवत एका दिवसात स्पर्धा पूर्ण करावी लागते. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे प्रचंड माेठे अाव्हान असते. समुद्रसपाटीपासून १२०० मीटर ते ३३४० मीटर अशी उंची, जगातील सर्वात कठीण एकदिवसीय सोलो सायकल स्पर्धा असलेली ‘टूर ड्रॅगन’ आजवर खूप कमी सायकलिस्टना पूर्ण करता आली आहे. प्रचंड थंडीत मध्य भूतानमधील बमथांग येथून निघाली हाेती. 
 
जसपालजींना समर्पित 
- पाच वर्षांपूर्वीच्या टूरच्या तुलनेत आम्ही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन सहभागी होत असल्याने निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करण्यात अाम्ही नक्कीच यशस्वी हाेऊ असा विश्वास हाेता. नाशिक सायकलिस्टचे माजी अध्यक्ष जसपालसिंगजी यांचे ‘टूर ड्रॅगन’ हे स्वप्न यशस्वीपणे पूर्ण करून त्यांना श्रद्धांजली वहात असून हे यश त्यांना समर्पित अाहे.
-डाॅ. हितेंद्र महाजन, ‘रॅम’वीर सायकलपटू 
बातम्या आणखी आहेत...