आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढे पाठ, मागे सपाट : पर्यटन मंत्र्यांच्या नव्या घाेषणा; जुन्यांकडे मात्र साफ डोळेझाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधील बलस्थानांना अधाेरेखित करत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी इगतपुरीत वेलनेस सेंटर, गडकिल्ल्यांचा विकास, तेथे निवासाची व्यवस्था, पर्वताराेहण संस्था सुरू करणे, अंजनेरीचा ट्रॅकिंगसाठी विकास, ग्रेप हार्वेस्टिंग फेस्टीवल, नाशिक फेस्टीवल, वाइन फेस्टीवल इत्यादी सुरू करण्याच्या घाेषणा नाशकात गेल्या दाेन दिवसांत केल्या खऱ्या; मात्र, गंगापूर धरणाजवळील बाेट क्लब, नाशिक चित्रनगरी, गाेदावरीची महाअारती यांसह अनेक जुन्या घाेषणांचा जणू त्यांना विसरच पडला अाहे. त्यामुळे ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशीच अवस्था सध्या पर्यटनमंत्र्यांची झालेली दिसते अाहे. 
 
नाशिक ट्रॅव्हल मार्टच्या निमित्ताने नाशकात मुक्कामी असलेल्या रावल यांनी शुक्रवार शनिवारी नाशिकच्या पर्यटनाशी संबंधित भरभरुन घाेषणा केल्या. त्यामुळे नाशिक अाता सुजलाम सुफलाम हाेईल, येथे पूर्णवेळ पर्यटकांचा वावर असेल अाणि लाेणावळा- खंडाळ्याला नाशिक हाच पर्याय असेल, अशी भाेळी अपेक्षा सर्वसामान्य नाशिककरांना लागली नसेल तर नवल. मात्र, या घाेषणा करताना जुन्या घाेषणांना स्पर्शही करण्याची ‘काळजी’ रावल यांनी घेतली. 
 
विशेषत: यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडी सरकारने केलेल्या घाेषणा अाणि राबविलेले अर्धवट प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ना त्यांच्याकडून प्रयत्न सुरू अाहेत, ना त्यादिशेने काही कार्यवाही चालू अाहे. 
 
बाेट क्लब धूळखात पडून 
शहरवासीयांच्या विरंगुळ्यात वाढ हाेण्याबराेबरच पर्यटकांचा मुक्काम वाढावा, या हेतूने गंगापूर धरणावर बाेट क्लब सुरू करण्यात अाला. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर या बोट क्लबकडे दुर्लक्ष झाले. परिणामी येथील नवीन ३६ अत्याधुनिक बनावटीच्या बाेटी धूळखात पडून अाहेत. शिवाय नाशिककरांनाही या प्रकल्पापासून वंचित राहावे लागत अाहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री रावल यांनी हा प्रकल्प तातडीने सुरू करण्याची ग्वाही दिली. मात्र, हे अाश्वासन हवेतच राहिले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, गाेदावरी अारतीचा निधीही रखडला, नाशिक चित्रनगरीची घाेषणा हवेतच आणि विमान सेवाही आजवर हवेतच...   
बातम्या आणखी आहेत...