आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा-दिवाळीमुळे नगररचनाला ‘अच्छे दिन’, २९ काेटींची वसुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कपाट क्षेत्र बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे विकासशुल्कासाठी मारामार झालेल्या महापालिकेच्या नगररचना विभागाला दसरा-दिवाळीमुळे ‘अच्छे दिन’ अाल्याचे चित्र असून, वार्षिक ८९ काेटींचे उद्दिष्ट असताना २९ काेटी रुपयांची सप्टेंबरअखेरीस वसुली झाल्याने अधिकाऱ्यांचा हुरूप वाढला अाहे. विशेष म्हणजे, टीडीअारच्या विकासशुल्कापाेटी काेटींचा बाेनस पालिकेला मिळाला असून, यापूर्वी जिना-पॅसेज, अल्टरनेट टेरेसपाेटी एक रुपयाही मिळणाऱ्या पालिकेला यंदा तब्बल १० काेटी रुपये मिळाले अाहे.
गेली दाेन वर्षे बांधकाम क्षेत्राला अत्यंत प्रतिकूल ठरली अाहेत. अाधीच बांधकाम क्षेत्रात मंदी असून, त्यात कपाट क्षेत्राशी निगडित वाद उभा ठाकला अाहे. त्यात नऊ मीटरखालील रस्त्यावर टीडीअार बंदी अाल्याने पुनर्विकासाबराेबरच छाेट्या व्यावसायिकांचे मरण झाले अाहे. दुसरीकडे, राष्ट्रीय हरित लवादामुळे शहरातील नवीन बांधकाम परवानगी पूर्णत्वाच्या दाखल्यावर निर्बंध अाले. अटी-शर्तीवर त्यातून सूट मिळणार असली तरी त्या अटी बघता सर्वसामान्य काय, परंतु माेठ्या विकसकांनाही घाम फुटत अाहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीचा माेठा फटका पालिकेला बसला अाहे. मध्यंतरी राज्य शासनाकडे बांधकाम परवानगी घेतलेल्या मात्र पूर्णत्वाचा दाखला घेतलेल्या इमारतीचा शाेध घेतला असता, अडीच हजार प्रकरणे उघडकीस अाले हाेते. अडीच हजार इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेतल्यास पालिकेला साधारण २०० काेटींपर्यंत विकासशुल्कापाेटी मिळतील, असाही अंदाज व्यक्त केला जात हाेता. प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रातील अडचणी दूर झालेल्या नाही. नवीन विकास अाराखडा विकास नियमावली जाहीर झाल्यावर बांधकाम क्षेत्राला ऊर्जितावस्था येईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, अाराखडा सादर करून कित्येक महिने उलटल्यावर मंजुरी मिळालेली नाही. विकासशुल्क अन्य बाबीतून येणारा महसूल कमी झाल्याने नगररचना विभागाला फारशी ‘किंमत’ उरलेली नव्हती. मात्र, नुकताच झालेला नवरात्राेत्सव, दसरा अाता पंधरवड्यावर अालेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगररचना विभागातील वर्दळ वाढली अाहे. त्यातून सप्टेंबरमध्ये नगररचना विभागाला तब्बल काेटी ३७ लाख रुपयांचा सर्वाधिक महसूल मिळाला. यंदाचे उद्दिष्ट ८९ काेटींचे असून, पालिकेला ३४ काेटी ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला अाहे. त्यात शासनाचे काेटी जाता २९ काेटी रुपये पालिकेला मिळणार अाहे.

{ बांधकाम विकास शुल्क १० काेटी ३२ लाख ४५ हजार
{ भूखंड विकास निधी काेटी ४० लाख ७६ हजार
{ जिना-पॅसेज काेटी ७४ लाख ६५ हजार
{ टीडीअार विकास शुल्क काेटी लाख
{ अल्टरनेट टेरेस काेटी २७ लाख
बातम्या आणखी आहेत...