आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारका सर्कलवरील काेंडी फाेडण्यासाठी ‘यू टर्न’चा प्रयाेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - द्वारका चाैकातील वाहतूक काेंडी फाेडण्यासाठी अाता प्रायाेगिक तत्त्वावर ‘यू टर्न’चा ताेडगा शाेधण्यात अाला अाहे. यासाठी रस्ता दुभाजक ताेडावे लागणार असल्याने काही ठिकाणी जंक्चर बंद करावे लागणार असल्याने महापालिका अायुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ना हरकत दाखला मागितला अाहे. 
 
यानुसार पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने द्वारका चाैकात येता थेट नव्याने तयार करण्यात येणाऱ्या मुंबईकडे जाणाऱ्या ‘अप रॅम्प’वरून जातील. तसेच, शहरातील वाहनधारकांनाही ‘यू टर्न’चाच वापर करावा लागणार अाहे. त्यामुळे सारडा सर्कल मुंबई नाक्याकडून येणारी अाणि पुण्याकडे जाणारी वाहने थेट द्वारका सर्कलवरून वळता धुळ्याकडे थाेडी पुढे जाऊन तेथून ‘यू टर्न’ घेत पुण्याकडे जातील. तसेच, पुण्याकडून येणारी धुळे किंवा नाशिक शहरात जाणारी वाहने ‘द्वारका’पासून पुढे जाता डाव्या बाजूला वळून वडाळा नाक्याच्या पुढून ‘यू टर्न’ घेतील. द्वारका चाैकातील हनुमान मंदिर अाणि वनविभाग कार्यालयाच्या पाठीमागील जागेतून यासाठी पर्यायी मार्ग काढण्याचे निश्चित करण्यात अाले अाहे. त्यामुळे पुण्याहून येणारी मुंबईकडे जाणारी वाहने द्वारका चाैकाच्या पुढील रॅम्पवरून मुंबईकडे जातील. त्याचबराेबर, शहरांतर्गत वाहतूक सर्व्हिसराेडने पुढे जाईल. तसेच, मुंबई-अाग्रा अाैरंगाबादकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यावरील जंक्चर इंदिरानगर येथील बाेगद्याप्रमाणे प्रायाेगिक तत्त्वावर ड्रम लावून बंद करण्यात येणार अाहे. त्यामुळे द्वारका येथून नाशिकराेडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना धुळ्याकडे जाऊन ‘यू टर्न’ घ्यावा लागणार अाहे. पुण्याहून नाशिक शहरात धुळ्याकडे येणारी वाहने डावीकडे वळून पुढे जात ‘यू टर्न’ घेऊन मार्गक्रमण करतील. 

द्वारका चाैकात राेजच हाेणारी वाहतुकीची काेंडी फाेडण्यासाठी अामदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने महापालिका अायुक्तांच्या दालनात अायाेजित बैठकीत हे नियाेजन करण्यात अाले. बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रशांत खाेडस्कर, पाेलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पाेलिस आयुक्त डॉ. अजय देवरे, महापालिकेचे शहर अभियंता यू. बी. पवार अादी उपस्थित हाेते. पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गाचा विस्तार खरबंदा पार्कपर्यंत करण्याचाही नियाेजनात समावेश अाहे. यासाठी सुमारे ६८ काेटी रुपयांची तरतूद करण्यात अाली अाहे. 

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांचे नियाेजन करण्यासाठी प्राधिकरणाने ना हरकत दाखला दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने तत्काळ कामे सुरू केली जाणार असल्याचे अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी यावेळी सांगितले. 
 
पाऊण तासाचा वेळ वाचेल 
^द्वारकाचाैकातील वाहतूक काेंडी शहरवासीयांसाठी कायमची डाेकेदुखी ठरली अाहे. यावर उपाययाेेजना करण्याची नितांत गरज हाेती. ‘यू टर्न’च्या प्रयाेगामुळे वाहनचालकांचा सुमारे पाऊण तासाचा वेळ वाचणार अाहेे. -देवयानी फरांदे, अामदार 
 
बातम्या आणखी आहेत...