आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्मेट, सीट बेल्ट सक्ती पोलिस कर्मचाऱ्यांपासून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट, सीट बेल्ट सक्ती कारवाईला शनिवारी (दि.२६) धडाकेबाज प्रारंभ झाला. ही कारवाई सर्वसामान्य नागरिकांवर नसून, चक्क पोलिस कर्मचाऱ्यांवर करण्यात येत आहे. या कारवाईची विशेषत: म्हणजे हेल्मेट नसल्यास पोलिस ठाणे, आयुक्तालय आणि इतर कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. हेल्मेट नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत आहे.
शहरात अपघातांची संख्या वाढत आहे. अपघातात गंभीर जखमी आणि मृत्यू टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह बहुतांशी पोलिस कर्मचारी हेल्मेट वापरत नसल्याचे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आले. नोटा बंदमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने पोलिस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीला काही प्रमाणात सूट दिली होती. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आयुक्तांनी कारवाईला प्रारंभ केला आहे. आपल्यापासूनच कारवाईला सुरुवात करत पोलिस ठाण्यात विनाहेल्मेट कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत प्रवेश नाकारण्यात आला. भद्रकाली, नाशिकरोड, पंचवटी, सरकारवाडा या पोलिस ठाण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरच हेल्मेटबाबत विचारणा केली जात आहे. कारवाईच्या भीतीने बहुतांशी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईनंतर जनजागृतीसाठी पोलिस आयुक्त पुढाकार घेणार आहेत.

स्वाइप मशिनचा वापर : वाहतूकविभाग आता स्वाइप मशिनद्वारे दंड आकारणार आहे. १२ मशिन उपलब्ध झाले. टोइंग दुचाकी उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांसह काही निवडक पॉइंटवर पोलिसांकडे हे स्वाइप मशिन देण्यात येणार आहे.

कारवाईची सुरुवात पोलिसांपासून
^हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली आहे. नागरिकांना हेल्मेट सक्ती करता वापरण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. काही प्रमाणात कारवाई सुरू आहे. मात्र, कारवाईची सुरुवात पोलिसांपासून करण्यात आली आहे. यानंतर मात्र सर्वांसाठी हेल्मेट सक्ती अनिवार्य राहील. नागरिकांनी सहकार्य करावे. -जयंत बजबळे, सहायक आयुक्त, शहर वाहतूक शाखा
बातम्या आणखी आहेत...