आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवसात २० हजार वाहनांवर विक्रमी कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि. १२) विशेष मोहिमेत एकाच दिवसात तब्बल २० हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणे, नो पार्किंग क्षेत्रात अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने वाहन पार्क करणे, कागदपत्रे जवळ बाळगणे, सिग्नल वा अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी कारणांमुळे दोषी चालकांवरही या मोहिमेत कारवाई करण्यात आली. 
 
शहरात अपघातांचीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या कमी व्हावी आणि बेशिस्त वाहनचालकांना कायद्याचा चाप बसावा म्हणून शहरात बुधवारी (दि. १२) पोलिसांनी विशेष माेहीम राबवली. यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात ६० पोलिस अधिकारी, २५० कर्मचारी, वाहतूक विभागाचे १० अधिकारी आणि २७० पोलिस कर्मचाऱ्यांच्यांमार्फत मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ५२ ठिकाणी करण्यात आलेल्या नाकेबंदीत वीस हजारहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात अाली. 
 
या कारवाईत अवैध प्रवासी वाहतूक करणे, ट्रिपल सिट, रहदारीस अडथळा ठरेल अशी पार्किंग करणे, मद्य सेवन करून वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट असणे, भरधाव वाहन चालविणे, रस्त्यावर हातगाडी, चारचाकी वाहनं उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी कारणांवरून दंडात्मर करण्यात आली आहे. यात तब्बल लाखांचा दंड वसुल करण्यात आला. 
हेल्मेटएेवजी स्कार्फला प्राधान्य देऊन जीवाच्या सुरक्षेकडे सर्रास दुर्लक्ष करणाऱ्या काॅलेजियन्सलाही पाेलिसांनी शिस्तीचे धडे देत हेल्मेट घालण्यास भाग पाडले नियम पालनाच्या सूचना केल्या. 

यापुढेही कारवाई... 
^आम्ही नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहोत. हेल्मेट, सीटबेल्ट हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत. नियम पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. -मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड 

अशीही कारवाई... 
मुंबईनाका,मायको सर्कलसह शहरातील काही ठिकाणी ज्या वाहनचालकांकडे हेल्मेट नव्हते अशा वाहनचालकांना ‘हेल्मेट आणा, पावती दाखवा आणि वाहन घेऊन जा’ असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच मुंबईनाका परिसरात तर मंडप लावून ज्या वाहनचालकांकडे हेल्मेट नाही अशांकडून ‘हेल्मेटचे फायदे’ या विषयावर निबंध लिहून घेण्यात आल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले. 
 
सिडको -  सिडकोभागातही विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल ६२ हजारांची दंडात्मक वसुली करण्यात आली. यात चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावणे, दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे, शिवाय वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगणे अशा विविध प्रकारे वाहनांची तपासणी करण्यात आली. 

सिडको इंदिरानगर परिसरात अंबड पोलिस इंदिरानगर पोलिसांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांचा फाैजफाटा दिवसभर तैनात होता. ज्या वाहनधारकाने सीट बेल्ट लावलेला नाही,ज्या दुचाकी नाका येथे ज्या दुचाकी धारकांनी वाहन चालवताना हेल्मेट असून घातलेले नाही अशा वाहनधारकांकडून एका कागदावर ‘हेल्मेट डोक्यावर घालण्यासाठी असते’ असे शंभर वेळा लिहून घेण्यात आले. पोलिसांनी एकी कडे दंडात्मक कारवाई केली, तर दुसरीकडे वाहनधारकांना हेल्मेट आणण्यासाठी अवधी देण्यात आला. ‘हेल्मेट आणा आणि जमा केलेले वाहन घेऊन जा’ अशीदेखील कार्यवाही करण्यात आली. यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...