आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेट-सीटबेल्टअभावी दीड महिन्यात 18 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात रस्ते सुरक्षा अंतर्गत हेल्मेटसक्ती करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जनजागृती अाणि दंडात्मक कारवाई सुरू असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि हेल्मेट वापरल्यामुळे जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०१७ या काळात १८ नागरिकांचा विविध अपघातांत जीव गेला आहे. वाहतूक विभागाकडून विविध उपाययोजना सुरू अाहेत; मात्र नागरिकांचा हेल्मेट वापरण्यास निरुत्साह आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. 
 
विविध रस्ते अपघातांमध्ये ट्रकच्या धडकेत, वाहनातून पडून आणि पादचाऱ्यास धडक दिल्याने सहा जणांचा जीव गेला असला तरी १२ जणांचा मृत्यू निव्वळ हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरल्याने झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून शहरातील रस्त्यांवर वाहतूक नियमांसंदर्भात प्रभावी जनजागृती केली जात आहे. हेल्मेटसक्तीही केली जात आहे. मात्र, नागरिकांकडून हेल्मेट वापरण्यास निरुत्साह दाखवला जात असल्याने वाहतूक पोलिस हतबल होत आहेत. केवळ दंड आकारण्यावर थांबता पोलिसांकडून हेल्मेट सक्तीसाठी जनजागृती केली जात असली तरी पोलिसांच्या या सूचनांकडे विशेषत: तरुणांकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

नाशिक २१ के मॅरेथॉनच्या नियाेजनामध्ये वाहतूक विभाग व्यस्त असल्याने कारवाई थंडावली होती. पुढे ही कारवाई अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाणार असल्याचे सहायक आयुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले.
 
वर्दळीच्या रस्त्यांवर अधिक अपघात 
वर्दळीच्या आणि रुंद रस्त्यांवर सर्वाधिक अपघात झाले आहेत. पंचवटी, अंबड, सातपूर, नाशिकरोड परिसरातील रस्त्यांवर १८ अपघातांत मृत्यू झाले आहेत. 

अाणखी प्रभावीपणे राबवणार मोहीम 
- रस्ते अपघातांत मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेटसक्ती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे. वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य द्यावे.
-जयंत बजबळे, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग 
बातम्या आणखी आहेत...