आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाविद्यालयातच झाली अनधिकृत वृक्षतोड; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पर्यावरण आणि पर्यावरणरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना शहरातील अनधिकृत वृक्षतोड मात्र थांबलेली नाही. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयीन परिसरातील सहा जुने वृक्ष बेकायदेशीररित्या तोडण्यात आले अाहेत. कोणत्याही परवानगीशिवाय हे वृक्ष ताेडण्यात अाल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पार्किंगची मागणी सुरू हाेती. या पार्किंगसाठी ही वृक्षताेड केली जाणार असल्याची कुणकूण विद्यार्थ्यांना लागल्यानंतर पार्किंगसाठी दुसऱ्या जागेचा विचार करावा, असा अाग्रह विद्यार्थ्यांकडून धरण्यात अाला. पण, याचा कोणताही विचार करता महाविद्यालयीन प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय घेतला. या ठिकाणी प्रथमदर्शनी प्रशासकीय पंचनाम्यामध्ये उंबराचे तीन, वडाचा एक, भेंडीचा एक रिठ्याचा असे सहा वृक्ष ताेडण्यात अाल्याची माहिती मिळते.

विद्यार्थ्यांनी याबाबत विचारणा केली असता प्रकरण वाढवण्याची सूचना दिली गेली. पर्यावरण रक्षणाबाबत महाविद्यालयांतून सतत प्रबोधन केले जाते, मात्र महाविद्यालयाकडूनच वृक्षताेडीबाबत अशी भूमिका घेतली गेल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने या वृक्षतोडीची गंभीर दखल घेत याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितलेे.

यापूर्वी ही घडला होता प्रकार : यापूर्वीबीवायके महाविद्यालयासमोरील वृक्ष ताेडल्याने त्यावेळी विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली सभा घेतली हाेती. या वेळीही मोठी वादावादी झाली होती. मात्र, पुन्हा थेट वृक्ष परवानगीशिवाय कापल्याने आता विद्यार्थी आवाज उठविणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संस्थेतर्फे उडवाउडवीची उत्तरे.. : याप्रकरणाबद्दल गोखले एज्युुकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. संस्थेच्या विभागीय सचिव दीप्ती देशपांडे यांनी संस्थेच्या वरिष्ठांशी बोलण्यास सांगितले. मात्र, वरिष्ठांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

सारवासारवीचे प्रयत्न : याठिकाणी असलेले वृक्ष तोडलेच गेले नसल्याचे भासविण्यासाठी त्या ठिकाणच्या झाडांचे बुंधे काढून घेत माती टाकून लेव्हल करण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी झाडांची मुळं उपटून ठेवण्यात आलेली आहेत.

पंचनामा केला अाहे
^महाविद्यालय परिसरातील हे वृक्ष कोणतीही पूर्वकल्पना देता ताेडण्यात अाली अाहेत. प्रामुख्याने या वृक्षांचा विस्तार छाटल्याचे सांगण्यात येत असले तरी परिसर भुईसपाट झाल्याचे निदर्शनास अाले अाहे. या ठिकाणी अनेक वृक्ष असल्याचा अंदाज आहे. तूर्त पंचनामा पूर्ण झाला आहे. तसेच, कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. -राजेंद्र पांडे, उद्यान निरीक्षक, महानगरपालिका
एचपीटीच्या प्राचार्यांना देणार कारणे दाखवा नाेटीस
एचपीटी महाविद्यालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार अाहे. त्यानंतर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक महेश तिवारी यांनी दिली. महापालिका क्षेत्रात वृक्ष छाटणी ताेड करण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी गरजेची अाहे. मात्र, एचपीटी महाविद्यालयाच्या प्रांगणातील काही झाडे ताेडली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांना दूरध्वनीद्वारे अाल्या. त्याची दखल घेत उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांना पाहणी केली असता त्यात उंबराची तीन, तसेच वड भेंडीचे प्रत्येकी एक झाड बेकायदेशीररीत्या ताेडल्याचे उघड झाले. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाला तीन दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असून, समाधानकारक उत्तर मिळाल्यास महाविद्यालयाचे प्राचार्यांविराेधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, असे तिवारी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...