आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक- दाेन ट्रकच्या भीषण अपघातात दोघे ठार, अतिवेगात धडकलेल्या ट्रकचा चक्काचूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकच्या द्वारका येथे झालेल्या अपघातात ट्रकचा अक्षरश : चुराडा झाला. - Divya Marathi
नाशिकच्या द्वारका येथे झालेल्या अपघातात ट्रकचा अक्षरश : चुराडा झाला.
नाशिक- मुंबई-अाग्रा महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर शनिवारी (दि. ११) पहाटे दोन ट्रकमध्ये भीषण अपघात हाेऊन दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. धडक देणाऱ्या ट्रकचा या अपघातात चक्काचूर झाला. महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला असला तरी गेल्या काही दिवसांपासून उड्डाणपुलावरून होणाऱ्या वेगवान वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. 
 
शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावरून मुुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच १८ एए ९९४८) द्वारका परिसरात पंक्चर झाला. या ट्रकचे टायर चालक बदलत असतानाच मागून अालेल्या ट्रकने (यूपी ७५ एम ५३५३) जाेरदार धडक दिली. यात धडक देणाऱ्या ट्रकचा चालक महेश सिंग (२७, रा. मुंब्री, मध्य प्रदेश) क्लीनर जागीच ठार झाले. याचबराेबर पुलावर उभ्या ट्रकचा चालक अशोक मांगीलाल चव्हाण (रा. मध्य प्रदेश) हा गंभीर जखमी झाला.
 
या घटनेची माहिती कळताच मुंबई नाका पोलिस ठाणे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. या प्रकरणी अमजद अब्दुल शकीर याला मुंबई नाका पोलिसंानी ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातामुळे काही काळासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नाेंद करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 
 
नियमबाह्य वाहतुकीकडे लक्ष देण्याची गरज 
गेल्या काही दिवसांपासून उड्डाणपुलावरील अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. उड्डाणपुलावरून होणाऱ्या नियमबाह्य वाहतुकीसह या ठिकाणाहून सर्रास दुचाकी जात असल्याने या विरोधात वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 
पुलावर थांबणाऱ्या वाहनांवर हवी कारवाई 
अनेकदा उड्डाणपुलावरच ट्रकचालक दुरुस्ती किंवा प्रवासी मिळविण्यासाठी थांबतात. यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हे प्रकार रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अाणि वाहतूक पोलिसांनी पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 
 
नियम माेडणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई 
- उड्डाणपुलावरून नियमभंगकरून वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. -सतीश सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक 
बातम्या आणखी आहेत...