Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» News About Truck Killed A Woman

नाशिक: ट्रकच्या चाकाखाली सापडून महिला ठार, सकाळी रंगपंचमी तर दुपारी मृत्यूची बातमी

प्रतिनिधी | Mar 19, 2017, 07:42 AM IST

सिडको -आपल्या मुलासोबत दुचाकीवरून घरी जात असलेल्या आईचा गतिरोधकावर आदळून तोल जाऊन पडल्याने मागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाल्याने सिडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेमंत जयप्रकाश भांबेरे (रा. पवननगर, श्रीरामनगर) हे आपली आई शोभा जयप्रकाश भांबेरे यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घेऊन घरी जात होते. उत्तमनगर येथील जनता विद्यालयासमोरून जात असताना त्यांची दुचाकी (एमएच १५ बीटी ६४७७) ही गतिरोधकावरआदळली गेली. गतिरोधकांची उंची चुकीच्या पद्धतीमुळे शोभा भांबेरे यांचा तोल गेला. आणि त्या रस्त्यावर पडल्या. याचवेळी मागून आयशर ट्रक (एम एच ०४ सी जी ३०६६) येत होता. ट्रकचालकाच्या लक्षात आल्याने भांबेरे या चाकाखाली आल्या. चाक थेट डोक्यावरून गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. काही कळायच्या आत एका क्षणार्धात घडलेल्या घटनेत शोभा जयप्रकाश भांबेरे (६२) यांचा मृत्यू झाला. गतिरोधकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर दिवसा अवजड वाहनांना बंदी असतानाही नियमबाह्य होणाऱ्या वाहतुकीमुळे एका महिलेचा बळी गेला. या अपघातासंदर्भात अंबड पोलिसांनी ट्रकचालक अाप्पा बच्छाव (रा. महाले फार्म, सिडको) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
सकाळी रंगपंचमी तर दुपारी मृत्यूची बातमी -रंगपंचमीच्या दिवशी शोभा भांबेरे या आजी आजूबाजूच्या शेजाऱ्यांसाेबत रंगपंचमीचा आनंद घेत होत्या. त्याचवेळी त्यांचा मुलगा हेमंत याला बँकेत काम निघाले. मात्र, त्या कामासाठी आईची सही गरजेची होती. म्हणून त्याने आईला आपल्या चिमुकल्या प्रियांशु (वय ४) दुचाकीवर घेऊन बँकेत गेला. रंगपंचमी साजरी करायची म्हणून काम आटोपून घरी येत असतानाच हा अपघात घडला आणि नातू प्रियांशुची आजी हेमंतची आई कायमची निघून गेली. शेजारी सर्व रंगपंचमी खेळत असताना त्यांना शोभा भांबेरे यांच्या मृत्यूची बातमी आल्याने परिसरात शाेककळा पसरली.
पुढील स्लाईडवर वाचा, गतिरोधकाचा दुसरा बळी...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended