आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वर दर्शन शुल्क प्रकरणात लक्ष द्यावे, उच्च न्यायालयाचे धर्मादाय आयुक्तांना आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशभरातील बारा ज्याेतििर्लंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांना लावण्यात आलेल्या शुल्क प्रकरणात लक्ष देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले आहे. 

त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात राेज हजाराे भाविक दर्शनासाठी येतात.  भाविकांना नियमित रांगाव्यतिरिक्त दर्शन घेण्यासाठी २०० रुपये शुल्क लावण्याचा विश्वस्तांनी निर्णय घेतला. परंतु, विश्वस्तांपैकीच एक असलेल्या ललिता शिंदे यांनी यावर अाक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, अशाप्रकारे दर्शनासाठी वेगळा शुल्क आकारणे म्हणजे एकप्रकारचा भेेदभावच आहे. शिवाय, भारतीय पुरातत्त्व खात्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान भारतातील संरक्षित वास्तू आहे. त्यामुळे पुरातन वास्तू अधिनियम १९५८ नुसार, अशाप्रकारचे शुल्क आकारता येत नाही. मी विश्वस्तांना असे शुल्क न आकारण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने ही तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे पाठवली असून त्यात लक्ष देण्याचे सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...