आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश शिष्यवृत्ती: अनुदान हजार रुपयांचे, झिरो बॅलन्स सुविधा असतानाही बँकेची 5 हजार रुपयांची अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थी त्याच्या आईच्या संयुक्त खात्यात जमा करण्याची शासनाची योजना आहे. त्यासाठी शासनाने बँकांना झिरो बॅलन्सवर असे खाते उघडण्याच्याही सूचना दिल्या आहेत. सुरुवातीला गणवेशाचे ४०० रुपये तसेच ६०० रुपयांची शिष्यवृत्ती खात्यात जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आईसह संयुक्त खाते बँकांत उघडले. परंतु, आता शासनाकडून मिळणारे अनुदान शिष्यवृत्ती अशी १००० रुपयांची रक्कम मिळण्यासाठी स्टेट बँकेने खात्यात किमान पाच हजार रुपये शिल्लक ठेवण्याची अट घातल्याने पालक अडचणीत सापडले आहेत. आधीच गेल्या वर्षभरापासून शिष्यवृत्ती आणि गणवेशाचा निधी विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. त्यात आता पाच हजार रुपयांची किमान रक्कम खात्यावर नसल्यास २० रुपये ते १०० रुपये यादरम्यान दंड लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. किमान जमा रकमेस बँकेच्या भाषेत मासिक सरासरी जमा (एमएबी) असे म्हटले जाते. 
 

खातेबंद करण्यासाठी लागणार ५०० रुपये 
खात्यातपाच हजार रुपयांची किमान रक्कम ठेवण्यासाठी पैसे नसतील आणि जर खाते बंद करायचे असेल तर स्टेशनरी शुल्क म्हणून बँकेत ५०० रुपये भरावे लागणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 
 
पाच हजारांच्या अटीमुळे अनेकांचे खातेच नाही : जिल्हापरिषद शाळेतील अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय मुले सर्व मुलींना शालेय गणवेश शासनातर्फे देण्यात येतो. एका विद्यार्थ्याला गणवेश मिळतात. २०० रुपये प्रति गणवेश याप्रमाणे ४०० रुपयांचे अनुदान मिळते. गेल्या वर्षापर्यंत शालेय व्यवस्थापन समिती या गणवेशाची खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करत होती. मात्र, यंदापासून अनुदान खात्यात जमा करण्यात येणार आहे. परंतु, खात्यात किमान हजार रुपयांच्या अटीमुळे अनेकांनी खातेच उघडले नसल्याचे चित्र आहे. 
 
लाभार्थ्यांची संख्या 
- २लाख ५० हजार विद्यार्थ्यांना ‘डायरेक्ट बेनिफिशिअरी ट्रान्सफर’ योजनेमार्फत बँक खात्यात दिले जातात ४०० रुपये 
- ५ वी ते वी शिष्यवृत्ती : १८ हजार विद्यार्थी 
- ८ वी ते १० वी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती : १६ हजार विद्यार्थी 
- शिक्षण परीक्षा शुल्क : १७ हजार ५०० विद्यार्थी 
- अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती : 4 हजार विद्यार्थी 
- गुणवत्त शिष्यवृत्ती : 3 हजार विद्यार्थी 

या शिष्यवृत्ती येतात बँकेत 
जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, मॅट्रिकपूर्व, माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पाचवी ते सातवीमधील मुलींना शिष्यवृत्ती, सफाई काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, नववी ते दहावीमधील अनुसूचित जातींच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अाठवी ते दहावीतील व्हीजे, एनटी एसबीईच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. 
 
विद्यार्थ्यांना विशेष खात्यात समाविष्ट करता येत नाही 
स्टेट बँकेने सर्व शहरी शाखांना मेट्रो शहरांच्या श्रेणीत टाकले आहे. यामुळे जिल्हा परिषदेसह इतर शाळेतील ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्टेट बँकेत विशेष खाते किंवा पंतप्रधान जनधन योजनेंतर्गतच्या खात्यात समाविष्ट करता येत नाही. कारण त्यांना वडील आणि आईच्या नावावर संयुक्त खाते उघडावे लागते. यामुळे या विद्यार्थ्यांची खाती नियमित खात्याप्रमाणेच गृहित धरुन त्यांच्याकडून हजारांची रक्कम घेतली जात आहे. 
- राम प्रकाश शाक्य, मुख्य प्रबंधक, ग्राहक सेवा चॅनल प्रबंधन, एसबीआय 
 
एक हजार रुपयासाठी हजार जमा करायचे का? 
मुलगी जिल्हा परिषद शाळेत शिकते. ६०० रुपयांची शिष्यवृत्ती आणि ४०० रुपयांच्या गणवेशासाठी स्टेट बँकेतील खात्यात किमान पाच हजार रुपयांची रक्कम शिल्लक ठेवण्यासाठी सांगितले जात आहे. आधीच दोन-दोन वर्षांनंतर शिष्यवृत्ती मिळते. त्यात आता पाच हजार रुपये कसे जमा करायचे हा प्रश्न आहे. 
- विनोद अढांगळे, पालक२ 
 
अधिकाऱ्यांमार्फत करणार चाैकशी 
शिष्यवृत्तीसाठी स्टेट बँकेने झिरो बॅलन्स खाते उघडण्याचे निर्देश आहेत. खात्यात किमान रक्कम म्हणून हजार ठेवण्याची आवश्यकता नाही. याबाबत सर्व बँकांत चौकशी करत त्यांना झिरो बॅलन्स खात्याबाबत सूचना केल्या जातील. 
- राजेंद्र कलाल, उपायुक्त, समाजकल्याण विभाग 
बातम्या आणखी आहेत...