आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर भरती परीक्षा पद्धतीत बदल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत बाेलताना डाॅ. सुभाष भामरे. - Divya Marathi
पत्रकार परिषदेत बाेलताना डाॅ. सुभाष भामरे.
नाशिक - लष्करातील कनिष्ठ पदाच्या भरती परीक्षेचे पेपर फुटल्याच्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी हाेणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले अाहे. अशा घटना टाळण्यासाठी आता परीक्षा पद्धतीत बदल केले जातील, येत्या एप्रिलमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. नव्याने परीक्षा हाेणार असल्यामुळे अाता परीक्षा झालेल्या ठिकाणांना तेथील पेपरना महत्त्व उरलेले नाही, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. 
 
लष्कर पेपरफुटी प्रकरण अत्यंत गंभीर असून, ठाणे पोलिसांनी ते उघडकीस आणल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले. या प्रकरणाचे पुण्यापासून ते ग्रामीण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात धागेदोरे असण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे त्याची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी होऊ लागली. त्याचे गांभीर्य पाहून संरक्षणमंत्र्यांनी चाैकशी सीबीआयकडे सोपविली. परंतु, चौकशीसोबतच ही परीक्षा पुन्हा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अाताच्या भरती परीक्षेचे पुनर्नियोजन करण्यासह संपूर्ण परीक्षा पद्धतीचे स्वरूपच बदलणार असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...