आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन डेवर राहणार ‘खाकी’ची करडी नजर, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर बरसणार पोलिसांचा दंडुका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आज साजरा होत असलेल्या व्हॅलेंटाइन डेवर यंदाही पोलिसांकडून ‘करडी’ नजर ठेवली जाणार आहे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा दंडुका बरसणार अाहे. व्हॅलेंटाइनच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता गंगापूररोड, कॉलेजरोड आदी ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी नसल्याने प्रेमीयुगुलांची गर्दी होण्याची शक्यता आहे. 
 
व्हॅलेंटाइन डे मंगळवारी (दि. १४) साजरा होत आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी नसल्याने प्रेमीयुगुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिस प्रशासनाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, नवश्या गणपती, आसाराम बापू पूल, बोट क्लब आणि शहरातील निर्जन स्थळांवर साध्या वेशातील पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. सर्वाधिक गर्दी कॉलेजरोड अाणि गंगापूररोड या दोन रस्त्यांवर होत असल्याचा अनुभव लक्षात घेत येथेही साध्या वेशातील पोलिसांची दिवसभर गस्त राहणार आहे. गुन्हे शाखेच्या पथकांसह पोलिस ठाण्याचे कर्मचारीदेखील बंदोबस्तकामी तैनात राहणार आहेत. विशेषत: आसाराम बापू पुलावर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांवर दंडुका बरसणार आहे. या परिसरात म्हसरूळ आणि गंगापूर पोलिसांचे पथक संयुक्त तैनात करण्यात आले आहे. 
 
स्टंटबाज रडारवर 
प्रेमी युगुलांना त्रास देणारे हुल्लडबाज आणि स्टंटबाजांवर पोलिसांची नजर राहणार आहे. भरधाव वेगात दुचाकी चालवणारे रायडर्स पोलिसांच्या रडारवर आहेत. या हुल्लडबाजांकडून आसाराम पुलावर स्टंटबाजी केली जाते. यादरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांची गस्त राहणार आहे. 

हुल्लड बाजांवर होणार कारवाई 
सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, याकरिता अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलिस पथक गस्तीद्वारे नजर ठेवणार आहे. डे साजरा करताना अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
-डॉ.रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
 
या ठिकाणी राहणार बंदोबस्त : कॉलेजरोड, गंगापूररोड, फाळके स्मारक, गंगापूर डॅम, महात्मानगर, गिरणारे रोडवरील काही हॉटेल या ठिकाणी शहर आणि ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...