आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावलाेपावली ‘नकारघंटा’च, खत प्रकल्पावर घंटागाडीतील बनवाबनवी महापाैरांसमाेर उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - १७६ काेटी रुपयांचा अारंभापासूनच वादग्रस्त असलेल्या घंटागाडी ठेक्यात अाेला सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत घातलेल्या महत्त्वाच्या अटीला ठेकेदारांना कशी तिलांजली दिली, याचा पर्दाफाश गुरुवारी महापाैर रंजना भानसी, उपमहापाैर प्रथमेश गिते यांच्यासमाेर झाला. विशेष म्हणजे, महापालिकेत भाजपची सत्ता असून राज्यातील सत्ताधारी भाजपनेच मे पासून अाेला सुका कचरा विलगीकरणाबाबत स्पष्ट अादेश दिला असताना तळाकडे त्याची अंमलबजावणी करता त्यावर पांघरुण घालण्याची बनवाबनवी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. 
 
डिसेंबरमध्ये ठेका दिल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतरही घंटागाडी ठेक्यातील महत्त्वाच्या अटींना बगल दिली जात असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अाता ठेकेदारावर कारवाई हाेते की पडदा टाकला, जाताे हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे. डिसेंबरमध्ये घंटागाडीच्या पाच वर्षांच्या ठेक्यासाठी सहा विभागनिहाय कामकाज सुरू झाले. साधारण प्रतिदिन ४०० मेट्रिक टन इतका कचरा संकलनासाठी २०६ लहान माेठ्या घंटागाड्या सुरू झाल्या. या ठेक्यात पारदर्शकता राहावी, कचऱ्यातून साेने कमवण्याचे प्रकार घडवू नये, यासाठी तत्कालीन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी अत्यंत कठाेरात कठाेर अशा ७३ अटी घातल्या हाेत्या. जीपीएस बसवणे, त्याचे मुख्यालय महापालिकेत ठेवणे, कर्मचाऱ्यांना नियमानुसार मास्क, ग्लाेव्हज अन्य सुरक्षा साधने देणे, अाेला सुका कचरा स्वतंत्र संकलनासाठी घंटागाडीत व्यवस्था ठेवणे, घंटागाडी विलंबाने अाल्यास प्रतिदिन १० हजार रूपये दंड अाकारणे अशा कठाेर अटी हाेत्या. जेणेकरून ठेकेदार खाबुगिरी करण्याचे धाडस करणार नाही मात्र गेडाम यांच्या बदलीनंतर या ठेक्यातील अटी-शर्तीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. डिसेंबर महिन्यात ठेका सुरू झाल्यानंतर अपेक्षित २०६ पैकी निम्म्याही घंटागाड्या रस्त्यावर अाल्याच नव्हत्या. ज्या घंटागाड्या सुरू झाल्या त्यात अाेला सुका कचरा संकलनाची व्यवस्था नव्हती. सुरुवातीला ठेक्याचा भंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईचा बागुलबुवा दाखवला गेला. प्रत्यक्षात अाता चार महिन्यानंतरही अनेक घंटागाड्यांमध्ये अाेला सुका कचरा संकलनाची व्यवस्थाच नसल्याचे समाेर अाले. महापाैर भानसी, उपमहापाैर गिते, भाजप गटनेते संभाजी माेरूस्कर, नगरसेवक मुकेश शहाणे यांनी खत प्रकल्पाला भेट देत घंटागाड्याची पाहणी केल्यानंतर हे बिंग फुटले. महापाैरांनी सलग तीन गाड्यांची पाहाणी केली मात्र यातील एकाही गाडीत अाेला सुका कचरा विलगीकरणाची व्यवस्था नव्हती. काही गाड्यांमध्ये अशी व्यवस्था असली तरी अाकारानुसार त्याचे क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळे केवळ दिखाव्यापुरते तशी तजवीज केल्याचे स्पष्ट झाले. 
 
ना मास्क, ग्लाेव्हज; असुरक्षित कर्मचारी 
घंटागाडी ठेक्यात कर्मचाऱ्यांना ग्लाेव्हज, मास्क, बुट अन्य सुविधा पुरवण्याचे बंधन अाहे. त्यापाेटी ठेक्यात विशिष्ट रक्कमही गृहीत धरली अाहे. मात्र खत प्रकल्पात घंटागाडी घेऊन अालेल्या अनेक कर्मचाऱ्यांकडे अशा पद्धतीची सुरक्षा साधने नव्हती. यासंबंधी महापाैरांनी अाराेग्यधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांना विचारणा केली असता, त्यांनी नेहमीप्रमाणे अजब उत्तर देत कर्मचारीच सुरक्षासाधने वापरत नसल्याचा दावा केला, मात्र महापाैरांनी त्याचे म्हणणे फेटाळत स्वत:च्या अाराेग्यासंबंधी असा हलगर्जीपणा काेणी करेल असे वाटत नाही. त्यामुळे त्याबाबत दक्षता घ्या, अशा सूचना केल्या.
 
कचरा विक्रीचे रॅकेट 
खतप्रकल्पावर अालेला परंतू प्रक्रियेच्या दृष्टीने निरुपयाेगी कचरा बाहेर विक्री करण्याचे रॅकेट असल्याचा अाराेप मुकेश शहाणे यांनी केला. बाहेरील गाडी खत प्रकल्पात येतेच कशी? असा प्रश्न करीत त्यांनी अाराेग्यधिकाऱ्यांना जाब विचारला. याबाबत संशय वाढला असून महापाैरांनी चाैकशीचे अादेश दिले अाहेत. 
 
ठेकेदारावर कारवाई करणार 
^अाेला सुकाकचरा विलगीकरणाची व्यवस्था नसल्यामुळे ठेकेदाराकडून अटी-शर्थीचा भंग झाला अाहे. अाराेग्यधिकाऱ्यामार्फत त्यांना नाेटीस देऊन कारवाई करण्याचे अादेश देणार अाहे. -रंजना भानसी, महापाैर. 
 
अाराेग्य अधिकारी ताेंडघशी 
अाराेग्यधिकारीडाॅ. विजय डेकाटे यांनी महापाैरांना दाैऱ्यापूर्वी सर्व २०६ घंटागाड्या खत प्रकल्पावर दुपारी उभ्या असतील असे अाश्वासन दिले हाेते. प्रत्यक्षात बाेटावर माेजण्याइतक्याच विशिष्ट ठेकेदारांच्या गाड्या येथे हाेत्या. यातील अनेक गाड्यांत कचरा विलगीकरणाची व्यवस्था नव्हती मात्र सर्वच गाड्यात अशी व्यवस्था अाहे, असे सांगत डाॅ देकाटे यांनी पाहाणीपूर्वीही महापाैरांची दिशाभूल केली. तपासणीत सलग तीन गाड्यात स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे समाेर अाल्यावर मात्र महापाैरांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. याप्रकरणी राज्य शासनाकडेही अाराेग्याधिकाऱ्यांची तक्रार केली जाईल, असेही सांगितले. 
 
नागरिकांवरील दंडात्मक कारवाई घेतली मागे 
महापालिकेच्याघंटागाडीतच अाेला सुका कचरा स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे बघून महापाैर भानसी यांनी मेपासून अाेला सुका कचरा संकलनाची स्वतंत्र व्यवस्था ठेवणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुलीची कारवाई मागे घेतली. प्रथम स्वत: परिपूर्ण हाेऊ त्यानंतरच शहरवासीयांना शिस्त लावली पाहिजे, असे मत व्यक्त करीत त्यांनी पालिकेच्या अाराेग्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. 
 
महापाैर रंजना भानसी यांनी गुरुवारी महापालिकेच्या खतप्रकल्पावर जाऊन तेथे घंटागाडीमध्ये अाेला कचरा सुका कचरा संकलनासांी स्वतंत्र व्यवस्था केली अाहे की नाही, याची पाहणी केली. यामध्ये खतप्रकल्पावरील सलग तीन गाड्यांमध्ये अशी व्यवस्था ठेकेदाराने केली नसल्याचे दिसून अाले. या बाबीची दखल घेत महापाैरांनी अाराेग्य अधिकारी डाॅ. डेकाटे यांची कानउघाडणी केली. 
 
बातम्या आणखी आहेत...