आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती विटंबनेच्या व्हिडिअाेचा पालिकेशी संबंध नाही- अायुक्त अभिषेक कृष्णा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक - मूर्तिदानासाठी अावाहन करणाऱ्या नाशिक महापालिकेकडूनच कशा पद्धतीने दान झालेल्या गणेशमूर्तींची विटंबना हाेते, याबाबत व्हायरल व्हिडिअाे महापालिकेशी संबंधित नसल्याचा दावा अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्थायी समितीत केला. पालिकेची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत त्यास खतपाणी घालू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. 
 
दरवर्षी पालिकेकडून गणेशमूर्ती दान करण्यासाठी अावाहन केले जाते. त्यासाठी महापालिका अावश्यक उपाययाेजनाही करते. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी साेशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिअाेमध्ये काही गणेशमूर्ती खड्ड्यात पुरल्या जात असल्याचे दाखवले गेले. त्यावर स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी हरकत घेतल्यानंतर अायुक्तांनी नागपूरला जिल्हाधिकारी असताना असाच व्हिडिअाे बघायला मिळाल्याचा दावा केला. याचा पालिकेशी संबंध नसल्याचे सांगितले. 
 
स्थायीतही महासभेप्रमाणे नियम : स्थायीसमितीत पत्रिकेवरील विषय पूर्ण झाल्यानंतर सदस्यांची त्यांच्या प्रभागातील प्रश्न उपस्थित केले जातात. विभागप्रमुखांवर दबाव आणून समस्या सोडवून घेण्याचा प्रयत्न यामागे असतो. कर दर ठरविण्याइतपतच अधिकार असलेल्या स्थायी समितीत किरकोळ विषयांवर चर्चा होत असल्याने स्थायी समितीच्या सभागृहाची अवस्था विभागिय बैठकीसारखी झाली आहे. विषयाला सोडून बोलण्याची प्रथा पडल्याने सभापती गांगुर्डे यांनी स्थायीत एकाच विषयावर यापुढे बोलता येईल, महासभेप्रमाणे नियम लागू करण्याचा निर्णय दिला. 
 
अखेर फुलकर यांच्यावर कारवाई : बिटकोरुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी जयंत फुलकर यांच्या खासगी वैद्यकीय व्यवसायाची चाैकशी झाली असून त्यांच्यावर कारवाईचे अादेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले. दरम्यान, पालिका मुख्यालयात नवीन लिफ्ट बसवणे, शहरातील कब्रस्तानमध्ये कागदपत्रे संकलित करण्यासाठी व्यक्ती नियुक्त करणे, ठेका देऊनही प्रमुख रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या, ठेकेदारावर कारवाई करणार, भंगार बाजारात पुन्हा अतिक्रमण होत असल्याने चौकशी करणे, तातडीने माध्यमिक शिक्षकांची पदे भरण्याच्या सूचना केल्या. 
 
बाेेलघेवड्यांना अावर 
काेणताही विषय असला की, अापले म्हणणे मांडण्यासाठी विषयांतर करण्यापर्यंत जाणाऱ्या सदस्यांना स्थायी समिती सभापतींनी अावर घातला. महासभेप्रमाणे विषयानुसार बाेलावे एका विषयावर एकाचवेळी बाेलता येईल, अशी तंबी त्यांनी सदस्यांना दिली.  
 
बातम्या आणखी आहेत...