आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक पांडे यांंची झाली, ‘माताेश्री’वरून कानउघाडणी, शिवसेनेतील राडेबाजीचे पडसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरुन शिवसेनेत झालेल्या राडेबाजीचे पडसाद थेट ‘माताेश्री’वर उमटले. शुक्रवारी (दि. ३) हा प्रकार झाल्यानंतर शनिवारी तातडीने शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी महापाैर विनायक पांडे यांना बाेलवून घेतले. यावेळी त्यांनी पांडे यांची कानउघडणी केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय निवडणुकीनंतर ‘माताेश्री’वरून जाहीर हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. 
 
महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी ( दि. ) उमेदवारी यादी जाहीर करता शिवसेनेने संबंधित उमेदवारांना चांडक सर्कल येथील एसएसके हाॅटेलमध्ये थेट एबी फाॅर्मचे वाटप केले. प्रभाग क्रमांक १३ मधून विनायक पांडे यांनी स्वत:साठी तर प्रभाग २४ मधून त्यांचे चिरंजीव ऋतुराज पांडे यांनी तिकीटाची मागणी केली हाेती.
 
 मात्र एका घरात दाेघांना तिकीट देता येणार नाही असे महानगरप्रमुखांनी स्पष्ट केल्याने विनायक पांडे संतप्त झाले. सुरुवातीला सुरु असलेल्या या वादाचे रुपांतर थेट धक्काबुक्कीत झाले. यावेळी हाॅटेलबाहेर कार्यकर्ते जमा हाेऊन तणावपुर्वक वातावण निर्माण झाले. जमावाला पांगवण्यासाठी पाेलिसांनी साैम्य लाठीमार केला. 
 
या संपूर्ण प्रकाराने कमालीचे संतप्त झालेले पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी तातडीने पांडे यांना मुंबईत बाेलवून घेतले. त्यानुसार शनिवारी (दि. ) पांडे माताेश्रीवर दाखल झाले. पांडे यांनी केलेल्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करीत यापुढे अशा चुका हाेणार नाही याची काळजी घेण्याचा यावेळी उध्दव ठाकरे यांनी दिला. 
 
तसेच त्यांची कानउघडणीही केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गैरसमजातून हा प्रकार झाल्याचे ‘माताेश्री’च्या भेटीनंतर पांडे यांनी पत्रकारांशी बाेलताना पुन्हा स्पष्ट केले. या प्रकारामुळे शहरात तसेच राजकीय गाेटात चागंलीच चर्चा रंगली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...