आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा दिवसांत शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून, शिक्षणमंत्र्यांचे शिक्षक संघटनांना आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड- तीन महिने वेतनापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांचे येत्या पंधरा दिवसांत राष्ट्रीयीकृत बँकेतून वेतन होईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी दिल्याने शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

जिल्हा बँकेत शिक्षकांचे वेतन अडकले आहे. शिक्षकांनी सोमवारी विभागीय महसूल आयुक्तालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले होते. यावेळी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दूरध्वनीवरुन शिक्षकांचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संवाद घडवून आणला होता. त्यानंतर तावडे यांनी मंगळवारी मंत्रालयात भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचे पदाधिकार्यांनी तावडे यांची भेट घेतली. 

यावेळी तावडे यांनी सांगितले की, राज्य शासनाने एखाद्या बँकेचे नाव सुचविले असते तर त्यामध्ये विरोधकांनी पुन्हा आरोप केले असते. त्यामुळे शासन यासाठी आरबीआयचे मार्गदर्शन घेत असून, येत्या पंधरा दिवसांत शिक्षकांचे वेतन हे राष्ट्रीयीकृत बँकांमधून होतील, असे आश्वासन तावडे यांनी दिले. त्यामुळे शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यावेळी शिक्षक आमदार नागो गाणार, वेणुनाथ कडू, पुरुषोत्तम रकिबे, डी. यू. अहिरे, नरेंद्र ठाकरे, शंकर सांगळे, दत्ता वाघेपाटील, शरद निकम, सचिन मेधने, संजय पवार, संजय पाटील, किरण पगार, हिरामण शिंदे, अनिल निकम, श्याम पाटील अादी उपस्थित होते.  
बातम्या आणखी आहेत...