आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान : मॉल असो वा शॉप; चेंजिंग रूमपासून महिलांना संरक्षण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एखाद्या माॅल किंवा कपड्यांच्या दुकानात पसंत पडलेला ड्रेस अापल्याला व्यवस्थित येताे की, नाही यासाठी चेंजिंग रूम असते. पण, या चेंजिंग रूममध्ये जायला अनेक महिला घाबरतात. कारण काही रूममध्ये विकृतांकडून छुपे कॅमेरे बसविल्याच्या अनेक घटना घडलेल्या अाहेत. यावरच उपाय म्हणून संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर विभागाच्या प्राजक्ता जगताप, कांचन मत, शीतल भोळे या विद्यार्थिनींनी व्ही‌डीएस हे साॅफ्टवेअर तयार केले अाहे. 
 
महिलांसाठी अत्यंत उपयाेगी असे साॅफ्टवेअर या विद्यार्थिनींनी तयार केले अाहे. व्हर्च्युअल ड्रेसिंग रूम युझिंग कायनेट हा अभियांत्रिकी प्रकल्प असून, व्हर्च्युअल ड्रेसिंग रूम साॅफ्टवेअर बनविले आहे की ज्याच्या वापराने आता मॉल असो वा शॉप चेंजिंग रूमपासून महिलांना मुक्ती मिळणार आहे. विद्यार्थिनींनी बनविलेले साॅफ्टवेअर ‘व्हर्च्युअल ड्रेसिंग रूम’ असे साॅफ्टवेअर असून, ज्याच्या वापराने आहे त्या ठिकाणी मॉल अथवा लहान मोठ्या शॉप्समध्ये असलेले सर्व कपडे म्हणजेच जीन्स , टोप्स, चुडीदार, गाऊन आदी उत्पादन वस्तू सिलेक्ट केल्यानंतर आपल्या शरीराच्या स्कॅन व्हर्च्युअल इमेजला ते आभासी परिधान करून ते कॉम्प्युटर, एलसीडीवर लगेचच क्षणात दाखविते. यामुळे आता मॉल असो वा शॉप चेंजिंग रूमपासून महिलांना मुक्ती मिळणार अाहे.
 
विद्यार्थिनींनी केलेल्या या आविष्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष हरिष संघवी, उपाध्यक्ष वर्षा संघवी, सदस्य राहुल संघवी यांच्या बरोबरच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अन्य विद्यार्थ्यांकडून या विद्यार्थिनींचे कौतुक हाेत आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, कसे काम करते हे साॅफ्टवेअर...?  
बातम्या आणखी आहेत...