आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाेख्या मार्गात मैत्रीचे अनाेखे किरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकमेकींना साथ देणाऱ्या प्रियंका भारती. - Divya Marathi
एकमेकींना साथ देणाऱ्या प्रियंका भारती.
नाशिक- मैत्रीच्या अाणाभाका केवळ फ्रेंडशिप डेला घेणारे अनेक असतात. परंतु प्रत्यक्षात ही मैत्री मनापासून निभावणारे माेजकेच.. केटीएचएम महाविद्यालयातील भारती निकम अाणि प्रियंका जाधव यांची मैत्री ही त्यांच्या अतूट नात्याने लक्षवेधी ठरतेय. 
 
या दाेघी एफवायबीएचे शिक्षण घेताय. त्यातील प्रियंका ही पूर्णत अंध.. काळ्याकुट्ट अंधाराशिवाय तिच्या अायुष्यात फार काही नव्हतं. पण तिला भारती भेटली अन‌् अापसूकच या अंधारातही अाशेची ज्याेत प्रज्वलित झाली. प्रियंका अाणि भारती समाजकल्याण वसतिगृहात एकाच खाेलीत राहतात. येथेच त्यांची अाेळख झाली. ही अाेळख पुढे घट्ट मैत्रीत रुपांतरित झाली. अाज प्रियंकाचे डाेळे म्हणजे भारती असं समीकरण बनलंय. अर्थात त्यामागे सहानुभूती वगैरे अजिबातच नाही. भारती राेजच अंधपण स्वत: जगते. रातांधळेपणाचा अाजार तिला अाहे.
त्यामुळे प्रियंकाच्या भावना तिला इतरांपेक्षा अधिक प्रकर्षाने कळतात. केवळ मैत्री निभावण्याची भावना दाेघींमध्ये असल्याने त्या एकमेकींबराेबर सावलीसारख्या बराेबर राहतात. काॅलेजात ते पुढच्या बाकावर असतात. शिक्षकांनी फळ्यावर काय लिहिलंय ही भारती प्रियंकाला समजावून सांगते. इतकेच नाही तर परीक्षा असेल तर प्रियंकाची रायटर म्हणून भारती असते. 
 
 
मैत्रीचे घट्ट बंध.. 
प्रियंका अाणि भारती समाजकल्याण वसतिगृहात एकाच खाेलीत राहतात. या दाेघींमधील मैत्री अतिशय घट्ट अाहे. त्या एकमेकींबराेबर सावलीसारख्या राहतात. त्यांच्यातील ज्या अपुऱ्या बाबी अाहेत त्यावर एकमेकींना साह्य करत मात करण्याचा त्यांचा प्रयत्न असताे. यातूनच त्यांच्यातील या अनाेख्या मैत्रीचे बंध अधिकच घट्ट झाले अाहेत. त्यांच्यासमाेर वेळाेवेळी अालेल्या अडचणी समस्या साेडविण्यातून त्यांच्यातील ही मैत्री अधिकच उजळली गेली अाहे. जीवनप्रवासातील खाचखळग्यातून त्या मार्गक्रमण करत अाहेत. शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची जिद्द ही इतरांनाही प्रेरणादायक ठरणारी अाहे. 
 
अन् अश्रू अनावर... 
भारती अाणि प्रियंकातील बंध किती अतूट अाहे हे समजण्यासाठी हे मासलेवाइक उदाहरण. काही दिवसांपूर्वी रविवार कारंजाच्या बस स्टाॅपवर भारती अाणि प्रियंका दाेन्ही बराेबर पाेहाेचल्या. बसमध्ये चढताना गर्दीत प्रियंकाचा हात सुटला अन् भारती बसमध्ये एकटीच पुढे गेली. अापल्याबराेबर प्रियंका नाही हे तिला उमजल्यावर तिच्या काळजाचा ठाेका चुकला. तिने क्षणाचाही विलंब करता प्रियंकाला माेबाइलवर संपर्क साधला. शेजारी उभ्या असलेल्या रिक्षात बसण्याचा सल्ला देत प्रथम रिक्षावाल्याचा नंबर घेऊन तिला सांगायला लावला. त्यानंतर भारतीने त्या रिक्षावाल्याशी संपर्क साधून प्रियंकाला काेठे साेडायचे ते सांगितले. प्रियंका पाेहाेचण्याच्या अाधीच भारती संबंधित ठिकाणी जाऊन उभी राहिली. ज्यावेळी दाेन्ही एकमेकींसमाेर अाल्या तेव्हा दाेघींचाही जीव भांड्यात पडला. अर्थात या भावना दाेघींनी अश्रूंद्वारे व्यक्त केल्या नसतील तर नवल. 
बातम्या आणखी आहेत...